पक्षवाढीसाठी महिला शिवसैनिकांनी सकारात्मकपणे काम करावे - नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 04:00 PM2024-02-11T16:00:34+5:302024-02-11T16:01:24+5:30
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा शिवदुर्गा महिला परिसंवादाचे आयोजन
मुंबई : कटकारस्थानाला बळी न पडता राजकीय पद मिळवता आली पाहिजेत. लोकांचा दबाव झुगारून काम केलं पाहिजे. स्वतःच्या कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहोचताना चांगला संदेश द्यायचा आहे. त्यादृष्टीने आपापल्या मतदारसंघात काम होणे गरजेचे आहे. पक्षाच्या वाढीसाठी सकारात्मकपणे काम करावे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा, महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत, मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय यांसारख्या योजना महिलांसाठी सरकारकडून राबविण्यात येत असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. मलबार हिल येथील नंदनवन येथे शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शिवदुर्गा महिला परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या.
याप्रसंगी आमदार यामिनी जाधव,शिवसेना उपनेत्या संध्या वाढावकर, कला शिंदे , दक्षिण मुंबई संपर्क प्रमुख ममता पालव, नीलम पवार, श्रद्धा हुले, प्रिया राणे, हंसा मारू यांसह दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भायखळा, शिवडी, मलबार हिल, वरळी, मुंबादेवी आणि कुलाबा या सहा विधानसभा मतदारसंघातील महिला शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे ऊत्कृष्ट आयोजन शिवसेना उपनेत्या आशाताई मामीडी व सुशीबेन शाह यांनी केले.