महिलांनी आपल्या घरातील पुरुषांना वीज बिल भरण्यासाठी सांगावे; वीज चोरी करण्यापासून दूर ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:07 AM2021-03-10T04:07:04+5:302021-03-10T04:07:04+5:30

मुंबई : महिलांनी आपल्या घरातील पुरुषांना वीज बिल भरण्यास सांगावे; तसेच वीज चोरी करण्यापासून दूर ठेवावे, असा संदेश ...

Women should ask the men in their household to pay the electricity bill; Avoid stealing electricity | महिलांनी आपल्या घरातील पुरुषांना वीज बिल भरण्यासाठी सांगावे; वीज चोरी करण्यापासून दूर ठेवावे

महिलांनी आपल्या घरातील पुरुषांना वीज बिल भरण्यासाठी सांगावे; वीज चोरी करण्यापासून दूर ठेवावे

Next

मुंबई : महिलांनी आपल्या घरातील पुरुषांना वीज बिल भरण्यास सांगावे; तसेच वीज चोरी करण्यापासून दूर ठेवावे, असा संदेश भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिला. शिवाय सर्व महिलांना वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याची विनंती केली. ‘माझे वीज बिल, माझी जबाबदारी’ हा मंत्र त्यांनी महिलांना दिला. जागतिक महिला दिनानिमित्त महावितरणच्या भांडुप परिमंडलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महा कृषी ऊर्जा अभियानाबाबत महिलांना माहिती देण्यात आली. उपस्थित असलेल्या महिला सरपंचांना तसेच ग्राहकांना याबाबत आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करा, त्याचे फायदे सांगा, असे आवाहन करण्यात आले. या वेळी महिलांना ‘कृषी धोरण २०२०’बाबत माहिती देण्यात आली. कृषी ऊर्जा अभियाना अंतर्गत थकबाकी भरणाऱ्या महिला ग्राहक मुमताज सय्यद, रत्नप्रभा काफरे, सुनंदा मोरे, स्नेहल जाधव, वर्षा कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Women should ask the men in their household to pay the electricity bill; Avoid stealing electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.