धक्कादायक! पती कामाला गेल्यावर 'ती' घरातूनच चालवायची सेक्स रॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 09:54 AM2019-08-12T09:54:25+5:302019-08-12T09:57:15+5:30
मुंबई उपनगरातील चारकोपमधील प्रकार
मुंबई : पती कामावर आणि मुलगी कॉलेजला जाताच, गृहिणी घरातूनच सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाली आहे. चारकोपमध्ये हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी ५६ वर्षांच्या महिलेला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ने बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.
चारकोप पश्चिमेच्या सेक्टर २ मधील एका टू बीएचके फ्लॅटमध्ये अटक आरोपी पती आणि मुलीसोबत राहते. पतीचे पार्टनरशिपमध्ये एक दुकान आहे, तर मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. यापूर्वी अटक आरोपी महिला विमा कंपनीमध्ये नोकरीला होती. त्यामुळे तिच्या संपर्कात अनेक जण होते. त्यामुळे कोण कसे काम करते? याचीही तिला माहिती होती. नोकरी सोडल्यानंतर, ती घरीच असे. पती आणि मुलगी घराबाहेर पडल्यानंतर, सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान ती एकटीच घरात असे. याच दरम्यान तिने घरातूनच वेश्याव्यसाय सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी व्हॉट्सअॅपवरून तिने पूर्वी संपर्कात असलेल्या मुलींना याबाबत सांगितले. त्यापाठोपाठ ग्राहकांची माहिती मिळविली.
आरोपी महिलेने त्यानंतर ग्राहकांना मुलींचे फोटो व्हॉट्सअॅपवरून पाठविण्यास सुरुवात केली. मुलीचा फोटो पसंत येताच ग्राहकाला घरी बोलावून, संबंधित मुलीसोबत त्याची भेट घालून द्यायची. अशा रीतीने घरातील दोन बेडरूमचा वापर ती वेश्याव्यवसायासाठी करू लागली. दिवसेंदिवस ग्राहक वाढले. मात्र, हीच बाब काहींच्या नजरेत पडली. याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११ला मिळाली. त्यानुसार, कक्ष ११चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, रईस शेख, सहायक पोलीस निरीक्षक शरद झिने, नितीन उतेकर आणि अंमलदार यांनी तपास सुरू केला. त्यानुसार, गुन्हे शाखेने बोगस ग्राहक पाठविला. त्यात महिला घरातूनच सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघड होताच, गुन्हे शाखेने शनिवारी छापा मारून महिलेला अटक केली आहे.
कुटुंबीयांना बसला धक्का!
ग्राहक आणि बारबालेवरुन ती पैसे ठरवायची. याबाबत तिच्या घरचे अंधारात होते. सकाळी लवकरच उठून घरातील काम उरकून ठेवत असे. त्यात, सायंकाळचे जेवणही तयार असत. घरातले बाहेर पडताच ती व्हॉट्सअॅपवरून व्यवहार ठरवत. पती आणि मुलगी रात्री घरी परतल्यानंतर घरात सगळे सुरळीत चाललेले दिसत होते. त्यामुळे तिच्यावर संशय येत नसे. या प्रकारामुळे तिच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. तिने आतापर्यंत किती ग्राहकांशी संपर्क साधला? याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.