Join us

नवा खासदार निवडण्यात महिला मतदारांचा वाटा मोठा, लोकसभा मतदारसंघात ४२ टक्के महिला मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:16 AM

मुंबई पश्चिम उपनगरात एकूण १४ विधानसभा मतदारसंघ येतात. तर, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात.

मुंबई :मुंबई पश्चिम उपनगरात एकूण १४ विधानसभा मतदारसंघ येतात. तर, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात. पश्चिम उपनगरात १८,२०,७१५ इतक्या म्हणजे ४४ टक्के महिला मतदार आहेत. 

दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथे एकूण ७,७८,५३७ म्हणजेच ४२ टक्के महिला मतदार असून, त्या मतदानाचा हक्क बजावतात.

यावेळी मी प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहे; परंतु मतदान हे ईव्हीएम मशीनवर न घेता मतपत्रिकेवर घेतले पाहिजे. निवडणूक  लोकशाहीचा स्तंभ आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा.  तसेच निवडणूक निःपक्षपातीपणे झाल्या पाहिजेत.- सुनिधी सुनील कुमरे, आदर्श नगर आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न-

युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी-मुंबई उपनगर राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम उपनगरात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बीएलओ, अंगणवाडी सेविका, स्वच्छ भारत अभियान संस्था चालक व त्यांचे सफाई मित्र हे मतदारांच्या घरी जाऊन त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.- डॉ. सुभाष दळवी, मुंबई शहर व उपनगराचेनिवडणूक स्वीप कार्यक्रम समन्वय अधिकारी 

महिला लोकप्रतिनिधी -

पश्चिम उपनगरात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन या दोन टर्म एकमेव खासदार आहेत. पश्चिम उपनगरात दहिसरमधून मनीषा चौधरी, वर्सोव्यातून डॉ. भारती लव्हेकर, गोरेगावमधून विद्या ठाकूर या भाजपच्या, तर अंधेरी पूर्व मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके अशा एकूण चार महिला आमदार आहेत.

टॅग्स :मुंबईलोकसभानिवडणूकमहिला