Maharashtra Election 2019: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत होणार महिलांचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 02:05 AM2019-10-21T02:05:23+5:302019-10-21T06:02:25+5:30
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येत आहेत.
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येत आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून, त्यांना लोकशाही प्रक्रियेत समान वाटा देण्याच्या उद्देशाने ही महिला मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. त्यांना सखी मतदान केंद्रे असे संबोधित करण्यात येत आहे. या सखी मतदान केंद्रांमध्ये निवडणूक कार्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारीदेखील महिलाच आहेत.
सखी मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या महिला मतदारांचे स्वागत कोकणातील महिला बचतगटांनी तयार केलेले खास कोकम सरबत देऊन करण्यात येणार आहे, तसेच महिला मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी ही मतदान केंद्रे रांगोळी, पोस्टर्सनी सजविण्यात येणार आहेत. मालाड पूर्व आणि शिवाजीनगर मानखुर्द येथे आवश्यकतेनुसार प्रत्येकी दोन सखी मतदान केंद्र असतील. लोकशाहीने नागरिकांना दिलेला सर्वोच्च अधिकार बजाविणाºया महिला मतदारांना या केंद्रांवर बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाºया कापडी पिशव्या भेट देण्यात येणार आहेत.