चेंबूरमध्ये महिलेस लुटले
By Admin | Published: October 1, 2014 12:06 AM2014-10-01T00:06:16+5:302014-10-01T00:06:16+5:30
चेंबूरमध्ये महिलेस लुटले
च ंबूरमध्ये महिलेस लुटलेमुंबई: बस थांब्यावर मुलासह बसची वाट पाहत असलेल्या महिलेचा मोबाईल चार लुटारुंनी लंपास केला. सोमवारी ही घटना चेंबूर परिसरात घडली असून याबाबत चेंबूर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. चेंबूरच्या आशीष सिनेमा परिसरात राहणारी भारती भी ही महिला तिच्या मुलासह गोल्फ क्लब बस थांब्यावर उभी होती. याच दरम्यान याठिकाणी ४ अनोळखी इसम आले. त्यांनी मुलाच्या हातातून १६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्ती खेचून घेतला. त्यानंतर चौघांनी बस थांब्यावरुन पळ काढला. सायंकाळची वेळ असल्याने या बस थांब्यावर जास्त गर्दी नव्हती. ही संधी साधत लुटारुंनी पोबरा केला. याबाबत महिलेने चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे. तसेच महिलेने दिलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र तयार केले असून त्यानुसार आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)