Join us

womens day 2018 : त्या बदल्यात 'तिला' किमान माणुसकीची वागणूक मिळावी – कल्पना सरोज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 9:33 PM

अपमान, भेदभाव, अत्याचार, त्याग, अपयश, आत्महत्या हे सगळे शब्द बाईजातीच्या नशिबी जणू काय लिहूनचं ठेवलेले आहेत. या गोष्टीचा सामना तिने देखील केला. ती म्हणजे कल्पना सरोज,  जिणे 2 रुपयांची नाणी घेऊन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात तर केली आणि आज ती दोन हजार कोटींची मालकीण झाली आहे.

पूजा बोरकरमुंबई- अपमान, भेदभाव, अत्याचार, त्याग, अपयश, आत्महत्या हे सगळे शब्द बाईजातीच्या नशिबी जणू काय लिहूनचं ठेवलेले आहेत. या गोष्टीचा सामना तिने देखील केला. ती म्हणजे कल्पना सरोज,  जिणे 2 रुपयांची नाणी घेऊन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात तर केली आणि आज ती दोन हजार कोटींची मालकीण झाली आहे.लहानपणी जसे आजी-आजोबा आपल्या नातीला ज्या परीची गोष्ट सांगतात, त्या गोष्टीतल्या परीसारखीच सरोज आहे. एकदम हलाखीच्या दलित कुटुंबात वाढलेल्या सरोजनं आज स्वकर्तृत्वावर कोटींची संपत्ती जमवली आहे. सरोजचं आयुष्य हे लहानपणापासूनच कष्टमय राहिलं आहे. 12 वर्षांची असतानाच सरोजचं लग्न झालं. काही काळानंतर नव-यानंही तिला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे समाजातील लोकांचे टोमणे ऐकून तिने आत्महत्येच्याही अयशस्वी प्रयत्न केला होता. आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे तिला कुटुंबीयांनी दूषणंही लावली.आत्महत्या केली असती तर थेट वडिलांचं नाव खराब झालं असतं, तुझं काही झालं असतं तर आम्ही लोकांना काय उत्तर दिलं असतं, असं बोलून तिला अनेकांनी खिजवलं. अशा परिस्थितीतही तिने स्वतःच्या आयुष्यातील खडतर प्रवास सुरूच ठेवला आणि तीच सरोज आज कोट्यधीश झाली आहे. आज ती एक यशस्वी उद्योजिका आहे. कमानी ट्युब्स नावाच्या कंपनीची ती मालकीण आहे. तसेच सामाजिक कार्यात देखील सक्रिय असून, तिने अनेकांना मदतीचा हात दिला आहे. तिच्या या संपूर्ण कार्याला लोकमत सलाम करतो. 

टॅग्स :बाईमाणूसमहिला दिन २०१८