Join us

केईएममध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग

By admin | Published: December 12, 2014 2:26 AM

लिफ्टमधील एकांताची संधी साधत वॉर्डबॉयने महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री परळच्या केईएम रूग्णालयात घडला.

मुंबई : लिफ्टमधील एकांताची संधी साधत वॉर्डबॉयने महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री परळच्या केईएम रूग्णालयात घडला.
पोपट भवारी (38) असे वॉर्डबॉयचे नाव असून भोईवाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. काल रात्री रूग्णालयाच्या लिफ्टमध्ये 27 वर्षीय महिला डॉक्टर आणि भवारी एकत्र होते. त्यांच्यासोबत आणखीही तीन ते चार व्यक्ती होत्या. मात्र त्या इच्छित मजल्यावर उतरल्या. तेव्हा लिफ्टचा दरवाजा बंद होताच भवारीने तिच्यासोबत ईल चाळे करण्यास सुरूवात केली. लिफ्ट थांबताच महिला डॉक्टरने आरडाओरडा केला. तेव्हा  कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई सचिन घाडगे, प्रीतेश शिंदे आणि देसाई यांनी    भवारीला ताब्यात घेतले.