महिलांचा लोकल प्रवास धोक्याचाच

By admin | Published: January 15, 2016 04:30 AM2016-01-15T04:30:08+5:302016-01-15T04:30:08+5:30

गेल्या काही काळापासून महिला सुरक्षेचा मुद्दा देशभर गाजतोय. खासकरून सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले. ‘लोकमत’ने २०१५च्या सुरुवातीला

Women's local travel risk | महिलांचा लोकल प्रवास धोक्याचाच

महिलांचा लोकल प्रवास धोक्याचाच

Next

- टीम लोकमत,  मुंबई
गेल्या काही काळापासून महिला सुरक्षेचा मुद्दा देशभर गाजतोय. खासकरून सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले. ‘लोकमत’ने २०१५च्या सुरुवातीला स्टिंग आॅपरेशनद्वारे रात्री प्रवास करताना महिला सुरक्षित नसल्याचे समोर आणले होते. वर्षभरानंतर तरी मुंबईतील तिन्ही लोकल मार्गांवरील महिला सुरक्षेचा आढावा टीम लोकमतने रिअ‍ॅलिटी चेकद्वारे घेतला. यात रात्री ११ ते १ वाजण्याच्या दरम्यान मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानके असुरक्षित असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. तर शिवडी ते सीएसटी ही स्थानके महिलांसाठी धोकादायक असल्याचे समोर आले.

पश्चिम रेल्वे - मुंबई सेंट्रल ते चर्चगेट स्थानके असुरक्षित

हार्बर रेल्वे - शिवडी ते सीएसटी स्थानकांवर धोका

मध्य रेल्वे - भायखळा ते सीएसटीमधील स्थानकांवर शुकशुकाट

भायखळा ते सीएसटीमधील स्थानकांवर असलेला शुकशुकाट रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी असुरक्षित असल्याचेही या पाहणीत निदर्शनास आले.

Web Title: Women's local travel risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.