महिलांचा लोकल प्रवास आजपासून सुरू, रेल्वे प्रशासनाची माहिती; राज्य सरकारच्या प्रस्तावाला दाखवला हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 07:43 AM2020-10-21T07:43:56+5:302020-10-21T07:44:40+5:30
रेल्वे प्रशासन लोकल प्रवास सुरू करण्यास नेहमीच सज्ज आहे. आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही महिलांच्या लोकल प्रवासास त्वरित परवानगी देत आहोत, असे गोयल यांनी टिष्ट्वटमध्ये नमूद केले आहे.
मुंबई :महिलांच्या रखडलेल्या लोकल प्रवासासंदर्भात राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली. त्यानुसार, बुधवारपासून सर्व महिलालोकलने प्रवास करु शकतील. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी टिष्ट्वट करुन माहिती दिली.
रेल्वे प्रशासन लोकल प्रवास सुरू करण्यास नेहमीच सज्ज आहे. आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही महिलांच्या लोकल प्रवासास त्वरित परवानगी देत आहोत, असे गोयल यांनी टिष्ट्वटमध्ये नमूद केले आहे.
‘मिशन बिगिन अगेन’
१सध्या मध्य रेल्वेवर दररोज ७०६, तर पश्चिम रेल्वे मार्गावर ७०० लोकल फेऱ्या चालविण्यात येतात. मात्र या लोकलमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे.
२दरम्यान, ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत राज्य सरकारने खासगी क्षेत्रात कार्यरत महिलांच्या लोकल प्रवासासाठी नुकताच हिरवा कंदील दाखवला होता.
३त्यानंतर आज गोयल यांनी बुधवारपासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान व सायंकाळी ७ नंतर शेवटच्या लोकलपर्यंत मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे जाहीर केले.
या वेळेत करता येणार प्रवास -
च्सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान.
च्सायंकाळी ७ नंतर शेवटच्या ११.३० च्या लोकलपर्यंत.
क्यूआर कोडची गरज नाही
महिला बुधवारपासून वैध तिकिटासह रेल्वे प्रवास करू शकतील. क्यूआर कोडची गरज नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि इतर सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अनावश्यक प्रवास टाळावा. त्यामुळे गर्दी होणार नाही.
- रेल्वे अधिकारी, मध्य रेल्वे