Join us

महिला मराठा महासंघ ‘तेजस्विनीं’ना गौरविणार, दादरच्या शिवाजी मंदिर सभागृहात होणार कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:56 AM

मुंबई : अखिल भारतीय महिला मराठा महासंघातर्फे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.

मुंबई : अखिल भारतीय महिला मराठा महासंघातर्फे विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिर सभागृहात शनिवारी, २८ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पार पडणा-या संमेलनादरम्यान हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.यंदाचे संमेलनाचे तिसरे वर्ष असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाच्या मुंबई अध्यक्षा कविता विचारे असतील. या वेळी समाजसेवा क्षेत्रासाठी सुनेत्रा अजित पवार, बँकिंग क्षेत्रासाठी शोभा सुधाकर सावंत, शैक्षणिक क्षेत्रासाठी वैशाली जोंधळे-पाटील अशा प्रकारे एकूण १० विविध नामांकित तेजस्विनींना गौरविले जाणार आहे. कार्यक्रमामध्ये विजया भोगले-पाटील, तेजस्विनी भाई जगताप, अ‍ॅड. प्रतिमा आशिष शेलार, नगरसेविका अलका केरकर, नगरसेविका प्रीती पाटणकर, अश्विनी राजे-जाधवराव यांची प्रमुख उपस्थिती असेल. संमेलनात महिला प्रेक्षकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार असून, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल, अशी माहिती महासंघाच्या सरचिटणीस ज्योती इंदप यांनी दिली. तरी अधिकाधिक महिलांनी संमेलनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाºया तेजस्विनींचे मार्गदर्शन घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन इंदप यांनी केले आहे.

टॅग्स :मराठामराठा क्रांती मोर्चा