Corona Vaccination: स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन घेता येईल कोविड प्रतिबंधक लस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:20 PM2021-05-24T22:20:52+5:302021-05-24T22:23:06+5:30

Corona Vaccination for child mother: स्तनदा मातांना लस देताना योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याचा दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रं तसेच वैद्यकीय माहिती समवेत बाळगणे आवश्यक आहे.

women's who have baby, can be vaccinated directly at vaccination centers in mumbai | Corona Vaccination: स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन घेता येईल कोविड प्रतिबंधक लस

Corona Vaccination: स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन घेता येईल कोविड प्रतिबंधक लस

Next

मुंबई : केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिनांक १९ मे २०२१ रोजी निर्गमित केलेल्या सुचनांनुसार, स्तनदा मातांनाही कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन नोंदणी करणाऱया (वॉक इन) स्तनदा मातांना कोविड लस देण्यात येणार आहे.

स्तनदा मातांना लस देताना योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याचा दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रं तसेच वैद्यकीय माहिती समवेत बाळगणे आवश्यक आहे. आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱया विविध पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येते. त्यामध्ये आता स्तनदा मातांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱया (वॉक इन) स्तनदा मातांचे लसीकरण केंद्रामध्ये जागेवरच नोंदणी करुन लागलीच त्यांना लस देण्यात येईल.

दरम्यान, गरोदर स्त्रियांना जर कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असेल, तर अशा गरोदर स्त्रियांना, त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञाने त्यांच्या शीर्षपत्रावर (लेटरहेड), कोविड लस देण्याबाबत तसे लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल. असे प्रमाणपत्र गरोदर स्त्रियांनी स्वतः स्त्री रोग तज्ज्ञाकडून प्राप्त केल्यानंतर कोविड लस घेण्याबाबत स्वतःचे संमतीपत्र देखील द्यावे लागेल. स्त्री रोग तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आणि संमतीपत्र अशी दोन्ही कागदपत्रं लसीकरण केंद्रावर येताना सोबत आणावी आणि लसीकरण केंद्राकडे सुपूर्द करावी. त्यानुसार, त्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

Web Title: women's who have baby, can be vaccinated directly at vaccination centers in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.