महिला दिनीही झाली महिला प्रवाशांची ‘लटकंती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 07:16 AM2018-03-09T07:16:58+5:302018-03-09T07:16:58+5:30

आतंरराष्ट्रीय महिला दिनीदेखील मुंबईकर महिला रेल्वे प्रवाशांच्या नशिबी लेटमार्क कायम असल्याचे दिसून आले. सकाळी ८ वाजून ०१ मिनिटांची कल्याण-सीएसएमटी महिला विशेष लोकल तब्बल २० मिनिटे उशिराने निघाली. लोकलमधील महिला प्रवाशांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा उपस्थित होते.

 Women's Woman Has Lent 'Ladies' | महिला दिनीही झाली महिला प्रवाशांची ‘लटकंती’

महिला दिनीही झाली महिला प्रवाशांची ‘लटकंती’

Next

मुंबई  - आतंरराष्ट्रीय महिला दिनीदेखील मुंबईकर महिला रेल्वे प्रवाशांच्या नशिबी लेटमार्क कायम असल्याचे दिसून आले. सकाळी ८ वाजून ०१ मिनिटांची कल्याण-सीएसएमटी महिला विशेष लोकल तब्बल २० मिनिटे उशिराने निघाली. लोकलमधील महिला प्रवाशांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा उपस्थित होते. या वेळी लेटमार्कमुळे संतप्त महिला प्रवाशांनी सीएसएमटी येथे थेट महाव्यवस्थापकांनाच घेराव घातला. कल्याण स्थानकातून सुटलेली महिला विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वेळेवरच आल्याचा दावा मध्य रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकाºयांनी केला आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वेने कल्याण-सीएसएमटी महिला विशेष लोकल सजवली होती. त्याचबरोबर या लोकलमध्ये मोटारमन, गार्ड आणि रेल्वे सुरक्षा बलासाठी देखील महिला कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. कल्याण स्थानकातूनच निघताना महिला विशेष लोकलला विलंब झाला. महिला विशेष लोकल कल्याण स्थानकात थांबवली, त्या वेळी दुसरी लोकल रवाना केल्याचा आरोप महिला प्रवाशांनी केला आहे. डोंबिवली स्थानकात या लोकलची वेळ ८ वाजून १० मिनिटे आहे. मात्र कल्याण स्थानकात झालेल्या विलंबामुळे ही लोकल डोंबिवली स्थानकात ८ वाजून ३० मिनिटांनी पोहचली.
गर्दीच्या वेळी एकच महिला विशेष लोकल असल्याने ही लोकल पकडण्यासाठी महिला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. सीएसएमटी स्थानकात महिला विशेष लोकलच्या स्वागतासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा उपस्थित होते. मात्र तब्बल २० मिनिटांच्या लेटमार्कमुळे महिला प्रवाशांनी महाव्यवस्थापकांना घेराव घालत गर्दीच्या वेळेत महिला लोकल वाढवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तरी मध्य रेल्वेकडून या बाबत कोणतीच दखल घेतली जात नाही. महिला दिनाचे ‘मार्केटिंग’ करण्यापेक्षा मध्य रेल्वे प्रशासनाने महिलांसाठी लोकल वाढवणे गरजेचे आहे. किमान लोकल वेळेत धावतील, याची काळजी घ्यावी, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली.

कल्याण स्थानकातून सुटलेली महिला विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वेळेवरच आली. प्रसिद्धिसाठी महिला प्रवाशांकडून आरोप करण्यात येतात. ते सर्व आरोप चुकीचे आहेत.
- ए.के.जैन,
वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्व

सायंकाळी लोकल उशिराने
सायंकाळी ५ वाजून ४१ मिनिटांनी सीएसएमटी-आसनगाव जलद लोकल पावणे सातच्या सुमारास सीएसएमटी येथे आली. लोकल विलंबाने असल्याची कोणतीही उद्घोषणा स्थानकात करण्यात येत नव्हती.

Web Title:  Women's Woman Has Lent 'Ladies'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.