‘वंडरफोल्ड’ उलगडणार ओरिगामीची दुनिया!

By admin | Published: December 10, 2014 12:41 AM2014-12-10T00:41:42+5:302014-12-10T00:41:42+5:30

ओरिगामीचा प्रसार होण्यासाठी, ‘ओरिगामी मित्र’ दरवर्षी आलटूनपालटून मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये तीन-चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करतात.

'Wonderfold' will be the world of Orgami! | ‘वंडरफोल्ड’ उलगडणार ओरिगामीची दुनिया!

‘वंडरफोल्ड’ उलगडणार ओरिगामीची दुनिया!

Next
मुंबई : ओरिगामीचा प्रसार होण्यासाठी, ‘ओरिगामी मित्र’ दरवर्षी आलटूनपालटून मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये तीन-चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करतात. वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ‘वंडरफोल्ड’ हे प्रदर्शन असते. एखादी मध्यवर्ती संकल्पना ठरवली जाते आणि सर्व सदस्य एकत्र बसून त्या वस्तू,  मॉडेल्स तयार करतात. कागदाच्या छोटय़ाशा तुकडय़ात जीव ओतणारी ही कला ‘वंडरफोल्ड-2क्14’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून 11 ते 14 डिसेंबरदरम्यान भेटीस येत आहे.
वंडरफोल्ड-2क्14 मध्ये अमेरिकेतील भारतीय मूळच्या विश्वविख्यात कलाकार मीनाक्षी मुकरजी मुख्य अतिथी म्हणून चारही दिवस उपस्थित राहणार आहेत. यंदा या प्रदर्शनाची ‘जेवणाचे टेबल’ ही संकल्पना असणार आहे. जेवणासाठी लागणारी भांडीकुंडी, काटे-चमचे, वाटय़ा-वाडगे-बशा यापासून ते अन्नपदार्थार्पयत सर्व काही कागदातून साकारण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक सदस्य स्वत:च्या आवडीनुसार ओरिगामीच्या विविध प्रकारांच्या कलाकृती तयार करून प्रदर्शनात मांडतात. ‘ओरिगामी मित्र’ या संस्थेद्वारे जपानच्या वाणिज्यदूत यांच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओरिगामी प्रदर्शन मुंबईकरांच्या भेटीस येत आहे. संस्थेचा उद्देश कलेचा प्रसार आणि कलेद्वारे शिक्षण हा आहे. हे प्रदर्शन जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्ट येथे हे प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेर्पयत खुले राहील. प्रदर्शन सर्वासाठी खुले असून विनामूल्य आहे. ओरिगामी शिकण्यासाठी प्रदर्शनादरम्यान वेगवेगळ्या स्तरांवरील कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: 'Wonderfold' will be the world of Orgami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.