जमीर काझी
मुंबई : ऐरवी नेहमी हातात शस्त्र, काठ्या घेवून समाजकंटक, आंदोलकांना पांगविणारे आणि नेत्यांच्या बंदोबस्तात दिवसरात्र व्यस्त असलेले आढळून येणारे खाकी वर्दीवाल्यांकडून आता चक्क कविता, चारोळी, शौर्यगीत आणि साहित्यावरील चर्चा, मतमतांतरे ऐकू येणार आहेत. तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही पण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात पहिल्यादाच ही घटना घडत आहे. महाराष्टÑ पोलिसांचे साहित्य संमेलन सोमवार, २५ फेब्रुवारीला मुंबईत भरत आहे.
पोलिसांकडून भरविले जाणारे हे देशातील पहिलेच साहित्य संमेलन असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक दिवस चालणाऱ्या या संमेलनात १७० पोलीस साहित्यिक सहभागी होतील. त्यामध्ये कॉन्स्टेबलपासून ते अप्पर महासंचालक दर्जापर्यतचे अधिकारी आपले साहित्य, विचार मांडतील. पोलिसांची सामाजिक जाणीव समाजापर्यत पोहचावी आणि जनतेशी सुसंवाद साधावा, या हेतूने राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकारामुळे हा अभिनव उपक्रम साकारला जात आहे.कामाच्या व्यापामुळे नित्यपणे ताणतणावाला सामोरे जावे लागते. तरीही त्यांच्यातील साहित्याविषयीची जाणीवा समाजासमोर मांडल्या पाहिजेत, या हेतूने राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पोलिसांचे साहित्य संमलेन घ्यावे, अशी कल्पना मांडल्यानंतर महासंचालक पडलसगीकर यांनी त्याला तात्काळ मान्यता देत सर्व कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. त्यानंतर राज्य राखीव दलाच्या प्रमुख व अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांनी राज्यभरातील आजी-माजी पोलीस लेखक, कवी, विचारवंत यांच्याशी संपर्क साधत पोलिसांचे पहिले संमेलनाची तयारी अंतिम टप्यात पोहचवली आहे.पोलीस दलातील अडीच दशकांतील अनुभवावर आधारित सहा पुस्तके लिहिलेल्या शेखर यांचे ‘प्रतिशोध’ या सत्यघटनेवरील सातव्या पुस्तकाचे प्रकाशन या पोलिसांच्या संमेलनात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, अशोक बागवे व प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगांवकर उपस्थित राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा सोहळा दिवसभर रंगणार आहे.सौहार्दपूर्ण वातावरणाची निर्मितीसदैव समाजाशी निगडीत असलेल्या पोलिसांचे भावविश्व, संवेदना समाजासमोर याव्यात. त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच दोन्ही घटकांमध्ये सुसंवाद घडून समाजामध्ये सोहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने पोलिसांचे साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे.- दत्ता पडसलगीकर, पोलीस महासंचालकव्यासपीठ होणार उपलब्धऊन-पाऊस, दिवस-रात्र अशी कशाचीही पर्वा न करता १२ ते १६ तास कर्तव्यात मग्न असणाºया पोलिसांच्या मनाचा हळवा कोपरा संमेलनाच्या माध्यमातून समाजासमोर येईल. त्यांच्या अडीअडचणी, समस्यांना वाचा फोडण्याबरोबच त्यांच्यातील कलेला साहित्य संमेलनाच्या निमित्याने व्यासपीठ मिळणार आहे.- बी.जी.शेखर, संमेलनाध्यक्ष व उपमहानिरीक्षक,एसआरपी, गोरेगाव