मिनी लॉकडाऊन हा शब्द घाबरविण्यासाठी नाही - महापौर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 07:29 AM2022-01-09T07:29:22+5:302022-01-09T07:29:33+5:30

बीकेसीतील जम्बो कोविड केंद्राला महापौरांनी शनिवारी भेट दिली. या केंद्रातील कोविड रुग्णांची त्यांनी विचारपूस केली.

The word mini lockdown is not to scare - the mayor of mumbai on Corona | मिनी लॉकडाऊन हा शब्द घाबरविण्यासाठी नाही - महापौर

मिनी लॉकडाऊन हा शब्द घाबरविण्यासाठी नाही - महापौर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  कोरोना संसर्ग वाढत असल्याने मुंबईत मिनी लॉकडाऊनचा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला होता. हा जनतेत घबराट पसरविण्याचा प्रकार असल्याचा टोला भाजपने लगावला. मात्र लॉकडाऊन आणि मिनी लॉकडाऊन हे शब्द घाबरविण्यासाठी नाहीत. काळजी घेतली तर लॉकडाऊन रोखता येऊ शकतो, असे स्पष्टीकरण महापौरांनी शनिवारी दिले.

बीकेसीतील जम्बो कोविड केंद्राला महापौरांनी शनिवारी भेट दिली. या केंद्रातील कोविड रुग्णांची त्यांनी विचारपूस केली. मुंबईत चौपट वेगाने रुग्णवाढ होत असून, घाबरण्यापेक्षा काळजी घ्यावी. लॉकडाऊन या शब्दापासून लांब राहायचे असेल तर कोविड प्रतिबंधक नियम पाळा, असे आवाहन त्यांनी केले.  

सलग तिसऱ्यादिवशी मुंबईत २० हजार रुग्ण
मुंबईत तर सलग तिसऱ्यादिवशी २० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले. फक्त समाधानकारक बाब ही, रुग्ण वाढत असले, तरी रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. शनिवारी २०,३१८ रुग्ण निदान झाले असून, ५ मृत्यूंची नोंद आहे. दिवसभरातील नोंद रुग्णांपैकी १६,६६१ रुग्ण लक्षणविरहित आहेत,

३९३ निवासी डॉक्टर कोरोना बाधित
मागील काही दिवसांपासून राज्यातील रुग्णालयांमधील मनुष्यबळाचा तुटवडा भरुन काढा या मागणीसाठी अजूनही आग्रही आहेत. मात्र आता शनिवारी राज्यातील ३९३ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सेंट्रल मार्डने दिली.

लसीकरणाचा वेग वाढणार
nमुंबईत १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू झाले आहे. 
nशुक्रवारपर्यंत ५८ हजार ६७८ मुलांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या ९ लसीकरण केंद्रांवर लसीच्या मात्रा देण्यात येत आहेत. 
nलसीकरणाला वेग देण्यासाठी येत्या सोमवारपासून आणखी २०० लसीकरण केंद्रांवर मुलांचे लसीकरण सुरू केले जाणार आहे. 
n२८ दिवसांत ९ लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

Web Title: The word mini lockdown is not to scare - the mayor of mumbai on Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.