अटलबिहारींचे शब्द, लता मंगेशकरांचे स्वर; दीदींची वाजपेयींना आगळी श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:40 PM2018-08-17T15:40:23+5:302018-08-17T15:40:45+5:30
अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले.
मुंबई- जगभरात आदराचे स्थान मिळवलेले भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी हे स्पष्टवक्ते होते, कवी होते, अनेकदा मृदू असत, आपल्या भूमिकांबाबत ठाम असत आणि विरोधकांसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. प्रत्येकाच्या भावनेचा विचार करून ते त्यांचा मानसन्मान करत असत.
ते सर्वार्थाने सर्वमान्य नेता होते. त्यांच्या निधनाने भारतातील अटलपर्वाचाच अस्त झाला आहे, असा सर्वमान्य नेता पुन्हा होणे नाही, अशी भावना देशभरात व्यक्त होत आहे. गानकोकिळा असलेल्या लता मंगेशकरांनी अटलबिहारी वाजपेयींना एक गाणं समर्पित करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गाण्यानं आदरांजली वाहून झाल्यानंतर त्या म्हणाल्या, त्यांना महान पुरुषांच्या जीवनाची चांगल्या प्रकारे जाण होती. तसेच आपण जिंकूच हा विश्वास त्यांनी स्वतःमध्ये नेहमीच बाळगला. ते दुसरे तिसरे कोणी नसून अटलबिहारी वाजपेयी होते. जीवन आणि मृत्यूमधील दरीला त्यांनी चांगल्या प्रकारे ओळखलं होतं. त्यांनी अनेक टीका करणा-या अहंकारी आणि विरोधी नेत्यांचं नेहमीच गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं. नेहमीच कायम माझे 'दादा'च राहतील. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. लता मंगेशकरांनी त्यांच्यासाठी गायलेलं गाणं यू ट्युबवर अपलोड करण्यात आलं असून, ते अटलजींच्या अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.