Join us

वांद्रे कलानगर फ्लायओव्हर प्रकल्पाचे काम जूनअखेर होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:07 AM

श्रीनिवास; विविध प्रकल्पांची पाहणी, एमएमआरडीएच्या पथकाला दिल्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. ...

श्रीनिवास; विविध प्रकल्पांची पाहणी, एमएमआरडीएच्या पथकाला दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी एकूण प्रगतीची पाहणी करण्यासाठी व वेळापत्रकानुसार काम प्रगतीपथावर आहे याची खात्री करण्यासाठी कलानगर फ्लायओव्हर साईटला भेट दिली. या प्रकल्पाचे काम जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए टीम समर्पितपणे काम करत आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

श्रीनिवास यांनी याव्यतिरिक्त मेट्रो लाईन अ संदर्भातील बैठकीत स्टेशनच्या कामासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि कंत्राटदार मुदतीचे पालन करीत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी एमएमआरडीए टीमला सूचना केल्या. श्रीनिवास यांनी प्रकल्पाच्या प्रगतीतील दिरंगाईचा आढावा घेण्यासाठी आणि कामाचा वेग वाढविण्यासाठी पुढील कार्यवाहीची योजना आखण्यासाठी मेट्रो लाईन ७ च्या साईटलाही भेट दिली. साईटवर प्रकल्प आढावा घेतल्यानंतर आयुक्तांनी मेट्रो रेल कॉम्प्रेसिंग वेळापत्रक आणि समांतर कामांवर चर्चा केली. गोरेगाव स्थानक ते मेट्रो लाईन ७ वरील राम मंदिर उपनगरी स्टेशन दरम्यानचे कनेक्शन तपासण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

श्रीनिवास यांनी प्रकल्प पूर्णतेचा आढावा घेण्यासाठी एमटीएचएल साईटला (पॅकेज -१) भेट दिली. प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख सप्टेंबर २०२३ च्या जवळ आणण्यासाठी संपूर्ण टीम अधिक प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी नमूद केले. २१.८ किमी लांबीचा हा प्रकल्प ४ पॅकेजेसमध्ये विभागला आहे.

वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पासंदर्भातील आढावा बैठकीनंतर श्रीनिवास यांनी बैठकीत चर्चा झालेल्या सर्व बाबींचे परीक्षण करण्यासाठी प्रकल्पस्थळी भेट दिली. या भेटीवेळी आयुक्तांनी ठरलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण करताना अडथळा आणू शकतील, अशा मुद्द्यांची संपूर्ण तपासणी केली आणि विविध उपायांबाबत माहिती घेतली.

.........................................