Join us

स्थलांतरित मजुरांच्या हाताला देणार काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 7:29 AM

प्रवीणसिंह परदेशी यांचे सूतोवाच: सोमवारपासून रोजगार देऊन आर्थिक-मानसिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न

मुंबई : अतिवृष्टी असो वा अतिरेकी हल्ला मुंबईने नेहमीच संकटांचा धैर्याने सामना करीत त्यावर मात केली. अशा प्रत्येक आपत्तीत एकजूट दाखविणाऱ्या मुंबईकरांच्या स्पिरिटचे कौतुकही झाले. मात्र कोरोनारूपी संकटाने सतत धावणाºया महानगरीला ब्रेक लावला. या अनिश्चित आणि अस्वस्थ वातावरणात सर्वच चिंंतातुर आहेत. त्याचे पडसाद वांद्रे रेल्वे स्थानकावरील गर्दीच्या रूपाने उमटले. या स्थितीवर मात करण्यासाठी मजुरांच्या हाताला काम देऊन त्यांना आर्थिक-मानसिक स्थैर्य देण्याचे सूतोवाच मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंंह परदेशी यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी शेफाली परब-पंडित यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत केले.

लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर रूप घेत आहे. त्यांचा रोष कसा शांत करणार?लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजूर कोंडले गेले आहेत. ते मानसिक दडपणाखाली आहेत. त्यांना काम दिले तर ते त्यात रमतील. त्यामुळे त्यांना व्यस्त ठेवण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात २० एप्रिलपासून काही कामे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पावसाळापूर्व कामे, गाळ काढणे, रस्त्यांची दुरुस्ती, जलवाहिन्यांची कामे सुरू होणार आहेत. त्यात या मजुरांच्या हाताला काम देण्यात येणार आहे.झोपडपट्ट्यांत कोरोनाचा प्रसाररोखण्यास काय अ‍ॅक्शन प्लॅन आहे?सर्वप्रथम कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आल्यानंतर तो परिसर सील करण्यात येतो. त्यामुळे त्या बाधित क्षेत्रातील लोकांना बाहेर जाता येत नाही आणि बाहेरील लोकांना आत प्रवेश देण्यात येत नाही. त्या परिसरातील लोकांच्या दैनंदिन गरजा भागविणे, त्यांना (पान २ वर)आता डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते कसे रोखणार?आपल्याकडे पीपीइ किटचे प्रमाण (स्वसंरक्षण) आधी कमी होते. मात्र आता पुरेसा साठा असल्याने वैद्यकीय कर्मचाºयांना पीपीइ किट पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रमाणावर काही अंशी नियंत्रण येण्यास मदत होईल. 

टॅग्स :स्थलांतरणमुंबई