Join us

एमआयडीसी स्थानकांत सरकते जिने बसविण्याच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:05 AM

मुंबई : कुलाबा - वांद्रे - सिप्झ, मेट्रो - ३ भूमिगत मार्गावरील काम वेगाने सुरू असून, आता मेट्रो स्थानकावर ...

मुंबई : कुलाबा - वांद्रे - सिप्झ, मेट्रो - ३ भूमिगत मार्गावरील काम वेगाने सुरू असून, आता मेट्रो स्थानकावर सरकते जिने बसविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. एमआयडीसी मेट्रो स्थानकापासून याचा प्रारंभ झाला आहे. एमआयडीसी स्थानकात लागणारा पहिला सरकता जिना बसविण्यास व कार्यान्वित होण्यासाठी सुमारे २०-२५ दिवस लागतील. त्यानंतर चाचणी घेण्यात येईल.

सरकत्या जिन्याचा नमुना संचाची सुरुवातीला चाचणी घेण्यात येईल. यानंतर सिद्धिविनायक स्टेशनवर लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. दोन्ही स्टेशन मिळून एकूण ४ नमुना संच बसविले जातील. या संचाच्या यशस्वी चाचणीनंतर इतर स्थानकावर हे काम सुरू होईल. मेट्रो - ३ मार्गावरील सर्व स्थानकांवर एकूण ४१४ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. या सरकत्या जिन्यांमध्ये पुनरुत्पादक ऊर्जा बचत यंत्रणा आहे. यामुळे ऊर्जेची बचत होईल, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे.