Join us

‘आशीर्वाद’चे पाडकाम सुरू

By admin | Published: February 28, 2016 1:16 AM

अभिनेता राजेश खन्ना यांचा कार्टर रोड येथील ‘वर्दन आशीर्वाद’ हा बंगला खरेदी केल्यानंतर, तब्बल दीड वर्षांनी त्याचे काम पाडकाम सुरू झाले आहे. बंगल्याचे नवे मालक शशी शेट्टी यांनी

मुंबई : अभिनेता राजेश खन्ना यांचा कार्टर रोड येथील ‘वर्दन आशीर्वाद’ हा बंगला खरेदी केल्यानंतर, तब्बल दीड वर्षांनी त्याचे काम पाडकाम सुरू झाले आहे. बंगल्याचे नवे मालक शशी शेट्टी यांनी या बंगल्याच्या पाडकामाला सुरुवात केली आहे.लॉजिस्टिक फर्म ‘आॅलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड’चे संस्थापक आणि मुख्य महाव्यवस्थापक शशी शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या जागी नवा बंगला बांधण्याची आमची योजना आहे. शिवाय, महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागानेही या संबधीची मंजुरी दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. राजेश खन्ना यांनी हा बंगला १९७० साली अभिनेता राजेंद्र कुमार यांच्याकडून ३.५ लाख रुपयांना खरेदी केला होता. त्या वेळी या बंगल्याचे नाव ‘डिम्पल’ होते. राजेश खन्ना यांना बंगल्याचे नाव बदलायचे नव्हते, परंतु राजेंद्र कुमार यांनी पाली हिल येथे आपल्यासाठी नवीन बंगला बांधला आणि त्याचे नावही त्यांनी ‘डिम्पल’ ठेवले. परिणामी, त्यानंतर राजेश खन्ना यांनी आपल्या बंगल्याचे नाव बदलले. (प्रतिनिधी)