मलबार हिल येथील संरक्षण भिंतीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण; एन. एस. पाटकर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 08:15 PM2021-06-24T20:15:21+5:302021-06-24T22:26:19+5:30

Mumbai News : अतिवृष्टीमुळे टेकडीचा भाग खचल्यानंतर आय. आय. टी., मुंबई यांच्या सहकार्याने तज्ज्ञ समिती नेमून सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली.

Work on the defense wall at Malabar Hill completed in record time; N. S. Traffic on both sides of Patkar Marg resumed | मलबार हिल येथील संरक्षण भिंतीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण; एन. एस. पाटकर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू

मलबार हिल येथील संरक्षण भिंतीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण; एन. एस. पाटकर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू

googlenewsNext

मुंबई - गेल्यावर्षी मुसळधार पावसात मलबार हिल येथील संरक्षण भिंत कोसळली होती. बाबुलनाथ जंक्शन परिसरातील व केम्स कॉर्नर जवळील एन. एस. पाटकर मार्गालगतचा टेकडी उताराचा हा भाग खचल्यानंतर त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासह रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते. हे काम विक्रमी वेळेत म्हणजेच अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण झाले आहे. त्यामुळे एन. एस.पाटकर मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मुंबईत ५ ऑगस्ट २०२१ रोजी मलबार हिल परिसरात तब्बल ३५७ मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता. या अतिवृष्टीमुळे दक्षिण मुंबई परिसरातील बाबुलनाथ जंक्शन जवळ असणा-या एन. एस. पाटकर मार्गाला लागून असणारा टेकडीच्या उताराचा भाग ढासळला होता. यामुळे टेकडीच्या वरुन जाणारा बी. जी. खेर मार्ग देखील प्रभावीत होऊन धोकादायक झाल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्यात आली होती.

अतिवृष्टीमुळे टेकडीचा भाग खचल्यानंतर आय. आय. टी., मुंबई यांच्या सहकार्याने तज्ज्ञ समिती नेमून सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. या सल्लागारांच्या सुचनांनुसार ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. या टेकडीच्या उतारालगत व एन. एस. पाटकर मार्गालगत मलबार हिलच्या बाधित भागाचे बळकटीकरण, संरक्षक भिंत उभारणे आणि रस्त्याखाली पर्जन्य जलवाहिनी बांधण्यासह रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम १ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आले. हे काम सहा महिन्यांत पूर्ण करून गुरुवारपासून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे.

- मलबार हिल येथे पाच मीटर उंचीची व १६० मीटर लांब संरक्षक भिंत बांधण्यात आली. या संरक्षक भिंतीची स्थापत्तीय वैशिष्ट्य म्हणजे सदर भिंतीची जाडी ही खालच्या बाजूला ९०० मिली मीटर असून वरच्या बाजूला ३०० मिली मीटर इतकी आहे.

- या भिंतीलगत असणा-या ५५० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. रस्त्याच्या खाली १२०० मिली मीटर व्यासाची व ५५० मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे.

- या रस्त्याची रुंदी ही पूर्वी सुमारे २४ मीटर इतकी होती.  आता २७ मीटर इतकी झाली आहे. या कामांमध्ये संरक्षक भिंत बांधणे, रस्त्याखाली पर्जन्य जलवाहिनी बांधणे आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, या प्रमुख कामांचा समावेश होता.

Web Title: Work on the defense wall at Malabar Hill completed in record time; N. S. Traffic on both sides of Patkar Marg resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई