शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत योग्य पद्धतीने काम करा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

By मनोहर कुंभेजकर | Published: June 17, 2024 03:44 PM2024-06-17T15:44:12+5:302024-06-17T15:44:43+5:30

मुंबई-विधानपरिषदेची  मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची येत्या २६ जून रोजी महत्वाची निवडणूक आहे.

Work in a proper manner in the election of the teacher s constituency MP Dr Shrikant Shinde | शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत योग्य पद्धतीने काम करा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत योग्य पद्धतीने काम करा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई-विधानपरिषदेची  मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची येत्या २६ जून रोजी महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर काल कुलाबा येथील महिला मंडळ सभागृहात शिंदे सेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात झालेली विकासकामे तसेच शिक्षण क्षेत्रात झालेली कामे शिक्षक मतदारांपर्यंत पोहचवावीत अशा सूचनाही यावेळी दिल्या. तर  शिक्षक मतदारसंघाचे शिंदे सेनेचे पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे यांना अधिक मतदान कसे होईल यासाठी सर्वांनी आपल्या विभागात प्रभावीपणे व योग्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रसंगी खासदार रवींद्र वायकर, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, किरण पावसकर, कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी आमदार तुकाराम काते, माजी आमदार अशोक पाटील यांच्यासह शिंदे सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित मुंबईतील शिंदे सेनेचे सर्व विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख,शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्या समवेत संवाद साधला. 

Web Title: Work in a proper manner in the election of the teacher s constituency MP Dr Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.