‘कलाश्रम’ संस्थेचे कार्य प्रशंसनीय - नागेश भाेसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:06 AM2021-04-04T04:06:19+5:302021-04-04T04:06:19+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या मान्यवरांची योग्य ती दखल घेण्याचे काम ...

The work of 'Kalashram' is commendable - Nagesh Bhasle | ‘कलाश्रम’ संस्थेचे कार्य प्रशंसनीय - नागेश भाेसले

‘कलाश्रम’ संस्थेचे कार्य प्रशंसनीय - नागेश भाेसले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या मान्यवरांची योग्य ती दखल घेण्याचे काम ‘कलाश्रम’ ही संस्था करत असून, संस्थेचे हे कार्य प्रशंसनीय आहे, असे गाैरवाेद्गार अभिनेते व दिग्दर्शक नागेश भोसले यांनी काढले. स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या ‘कलाश्रम’ संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या ‘अभियान सन्मान’ पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मान्यवर दिवंगतांची स्मृती जागवणारा व वर्तमानात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यांची दखल घेणारा ‘अभियान सन्मान सोहळा’ अलीकडेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील हिंदुस्थानी सभागृहात पार पडला. पत्रकार राज चिंचणकर, मिमिक्री कलावंत राहुलकुमार, लोकगायिका संचिता मोरजकर व अभिनेते प्रमोद सुर्वे यांना या वेळी नागेश भोसले यांच्या हस्ते ‘दखलपत्रे’ प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार व चित्रपट अभ्यासक दिवाकर गंधे, ‘हसरी उठाठेव’ या एकपात्री कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद चांदेकर, लोकगीत-लावणी गायिका शोभा राणे-गायकवाड व ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद कोठारे यांच्या स्मृतिदिनांचे औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात आले. या मान्यवरांचे आप्तस्वकीय सोहळ्याला उपस्थित होते.

---------------------------------------------------------------------------

Web Title: The work of 'Kalashram' is commendable - Nagesh Bhasle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.