माहूल पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचे काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:25+5:302021-07-20T04:06:25+5:30

मुंबई : माहूल येथील पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून, हे केंद्र पूर्ण झाल्‍यानंतर कुर्ला, शीव, ...

Work on Mahul Parjanya Jal Udhanchan Kendra will start | माहूल पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचे काम सुरू होणार

माहूल पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचे काम सुरू होणार

Next

मुंबई : माहूल येथील पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून, हे केंद्र पूर्ण झाल्‍यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्‍यादी परिसरातील पाणी साचण्‍याचा प्रश्‍न निकाली निघेल, असा विश्वास महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला आहे. उपनगरीय रेल्‍वे रुळांवर साचणाऱ्या पावसाच्‍या पाण्‍याच्‍या अनुषंगाने चहल बोलत होते.

मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना इकबाल सिंह चहल म्‍हणाले की, शनिवार रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्‍या काही तासांमध्‍ये २०० मिलिमीटरपेक्षा जास्‍त पावसाची नोंद रविवारी झाली आहे. या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दुर्घटनांच्‍या स्‍थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्‍यात आले. पावसामुळे होणाऱ्या भूस्‍खलन घटना पाहता, संभाव्‍य ठिकाणांवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्‍थलांतर व पुनर्वसन करण्‍याबाबतची कार्यवाही देखील करण्‍यात येत आहे.

अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त सुरेश काकाणी म्‍हणाले की, मलेरिया, डेंग्यू आणि लेप्‍टो या आजारांचा फैलाव होऊ नये म्‍हणून आवश्‍यक प्रतिबंधक उपाययोजना सुरू आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात आहे.

Web Title: Work on Mahul Parjanya Jal Udhanchan Kendra will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.