मुंबई : वेंगुर्ला-सागरेश्वर येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र या स्मारकाचे काम कित्येक वर्षांपासून रखडले असून केवळ कागदावरच आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर या स्मारकाच्या कामास सुरुवात झाली नाही. या कामाकडे लक्ष देण्याची विनंती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वांद्रे शाखेने केली आहे.पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी लक्ष द्यावे, असे निवेदन श्रीकांत जाधव यांनी सरकारकडे दिले आहे.स्मारकाबाबत पर्यटन मंत्री व भाषा मंत्री यांनी १० मार्च या मंगेश पाडगावकर यांच्या जयंतीपूर्वी चौकशी करावी; अन्यथा स्मारकाचा निधी पुन्हा सरकार दरबारी जमा होण्याची शक्यता आहे.- श्रीकांत जाधव, अध्यक्ष, कोमसाप वांद्रे शाखा
पाडगावकर यांचे स्मारक ‘कागदावरच’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 2:50 AM