मुंबई : मध्य रेल्वेला मस्जिद रेल्वेस्थानकातील रुळावर पावसाळ्यात पाणी साचते. रेल्वेला अडथळा न आणता सूक्ष्म-बोगदा पद्धतीद्वारे १००० मिमी व्यासाचा आरसीसी पाइप टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या सूक्ष्म बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
सूक्ष्म-बोगदा पद्धतीमुळे सँडहर्स्ट रोड स्टेशन परिसरात १८०० मिमी व्यासाचे ४२५ मीटर लांबीचे आरसीसी पाइप पश्चिमेकडून पूर्वेकडे रेल्वे रुळ ओलांडून जोडण्यात आले होते. खूप चांगले परिणाम मिळाले आहेत.
फेब्रुवारी २०२१ मध्ये महापालिका आयुक्त आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या समन्वयाने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. जिथे पावसाळ्यात रुळावर पूर येऊ नये म्हणून प्रकल्प पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण तीव्र पावसासह उच्च ओहोटी, कल्व्हर्टची अपुरी क्षमता व कमी पाण्याचा निचरा यामुळे परिस्थिती बिकट होते.
हा प्रकल्प जो रेल्वे क्षेत्र आणि महापालिका क्षेत्र दोन्ही व्यापतो, रेल्वेच्या सहकार्याने एप्रिल २०२१ च्या अखेरीस सुरू झाला आणि रेल्वे क्षेत्रातील काम अलीकडेच पूर्ण झाले. बृहन्मुंबई मनपा नेटवर्कसह नवीन घातलेल्या आरसीसी पाइपच्या जोडणीचे काम बृहन्मुंबई मनपाद्वारे प्रगतिपथावर आहे आणि ते या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यावर या नव्याने टाकलेल्या आरसीसी पाइप कल्व्हर्टमधून पावसाचे पाणी बायपास केले जाईल ज्यामुळे रेल्वे परिसरात येणारे पावसाचे पाणी टाळता येईल आणि ट्रॅकवरील पूर (जलभराव)दूर होईल. मनपा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सूक्ष्म बोगद्याचे असेच काम यावर्षी पावसाळ्यात सँडहर्स्ट रोड स्टेशन आणि दादर - परळ परिसरात यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
---
मायक्रो-टनेलिंग हे एक चांगले तंत्रज्ञान आहे, जे मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेले आहे आणि अलीकडेच सँडहर्स्ट रोड रेल्वेस्टेशन परिसरात प्रयत्नांती चाचणी करून अमलात आणले आहे. मस्जिद रेल्वेस्थानकावरील रेल्वे भागातील सूक्ष्म बोगद्याचे काम अतिशय कमी कालावधीत पूर्ण झाले आहे आणि यामुळे पावसाळ्यात या रेल्वे स्थानकावर पाणी ओसरण्यास मदत होईल.
अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
केलेले उपक्रम:
•पाइपची पातळी निश्चित करण्यासाठी तपशीलवार भौगोलिक सर्वेक्षण.
• भूमिगत अडथळा शोधण्यासाठी सर्वेक्षण.
• बोअर लॉग घेऊन भूवैज्ञानिक सर्वेक्षण.
• जॅकिंग आणि रिसिव्हिंग पीटचे बांधकाम.
• एक सूक्ष्म बोगदा बोरिंग यंत्र संरेखित करणे आणि स्थापित करणे.
•१००० मिमी व्यास आरसीसी जॅकिंग मानक पाइप्सची कास्टिंग आणि चाचणी.
• मायक्रो टनेलिंग बोरिंग मशीनद्वारे आरसीसी जॅकिंग पाइप घालणे.