रानसई धरणातील गाळाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू

By admin | Published: February 25, 2015 10:23 PM2015-02-25T22:23:37+5:302015-02-25T22:23:37+5:30

रानसई धरणात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ भरलेला आहे. धरणात जमलेल्या गाळाचा, पाण्याची साठवणूक क्षमतेच्या कामाचा शासनामार्फत सर्व्हे सुरू करण्यात आला आहे

The work of Ranchi dam camp survey is going on | रानसई धरणातील गाळाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू

रानसई धरणातील गाळाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू

Next

उरण : रानसई धरणात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ भरलेला आहे. धरणात जमलेल्या गाळाचा, पाण्याची साठवणूक क्षमतेच्या कामाचा शासनामार्फत सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. सर्व्हे करून गाळ काढण्याच्या अहवालानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे. रानसई धरणातील गाळ काढण्याचा निर्णय झाल्यास धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढेल, असा विश्वास रानसई उपविभाग अभियंता आर. के. गोसावी यांनी व्यक्त केला आहे.
उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाचे काम १९७० साली करण्यात आले आहे. ७७० फूट लांबीचे आणि ४६ फूट खोलीचे धरण १३६० हेक्टरमध्ये उभारण्यात आले आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १ हजार कोटी लिटर्स (१० एमसीएम) इतकी आहे. उरण परिसरातील ३५ ग्रामपंचायती, उरण शहर आणि जेएनपीटी, ओएनजीसी, जीटीपीईएस आणि इतर काही कंपन्यांना एकमेव असलेल्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या धरणात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. गाळ साचल्याने धरणाची पाणीसाठवण क्षमता घटली आहे. त्याचा विपरित परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
रानसई धरणातील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. मात्र त्याकडे शासनाकडून दुर्लक्षच केले जात होते. आता पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणाचे काम केंद्राच्या माध्यमातून खडकवासला येथील कंपनीला देण्यात आले आहे. त्याचा अहवाल १५ दिवसांत प्राप्त होईल. त्यानंतरच गाळ काढण्याबाबत पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती रानसई उपविभागीय उपअभियंता आर. के. गोसावी यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: The work of Ranchi dam camp survey is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.