निकालांचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:43 AM2018-05-24T01:43:06+5:302018-05-24T01:43:06+5:30

मुंबई विद्यापीठ : विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

Work on the results of the battlefield | निकालांचे काम युद्धपातळीवर

निकालांचे काम युद्धपातळीवर

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आतापर्यंत हिवाळी सत्र परीक्षांचे ४०२ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत. हे निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हे निकालाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर हा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
शिल्लक असलेल्या निकालांमध्ये प्रामुख्याने एमकॉम सेमिस्टर तीनचा निकाल जाहीर होणे बाकी आहेत. या निकालाचे कामही सध्या अंतिम टप्प्यात असून, सुमारे २५० ते ३०० उत्तरपत्रिका तपासणे बाकी असल्याची माहिती पुढे आली आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या दोन ते तीन दिवसांत हे निकालाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर हा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या एका अधिकाºयाने दिली.
मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या आॅनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे उन्हाळी सत्र परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास नोव्हेंबर उजाडला. त्यातच प्रशासनाने हिवाळी परीक्षांतील उत्तरपत्रिकांसाठीही आॅनलाइन मूल्यांकन कायम ठेवल्याने, या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विद्यार्थ्यांनी यंदाही आंदोलने, निवेदन देत, निकालासाठी परीक्षा विभागाकडे विनवणी केली. त्यामुळे रखडलेल्या निकालासाठी विद्यापीठाने निकाल कामांचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर, आता निकाल कामांचा वेग वाढला असून, लॉ शाखेसह इतर महत्त्वाच्या निकालांची घोषणा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केली. मात्र, एमकॉमच्या अभ्यासक्रमाचे काही निकाल जाहीर होणे शिल्लक होते. त्यापैकी एमकॉम पार्ट दोन या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला आहे. उर्वरित निकालही लवकरात लवकर लावले जाणार आहेत.

Web Title: Work on the results of the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.