आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अंडरपासचे काम लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:07 AM2021-04-21T04:07:23+5:302021-04-21T04:07:23+5:30

मुंबई : एमएमआरडीएकडून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांवर टप्प्याटप्प्याने सौंदर्यीकरण, वाहतूक व्यवस्थापन, पादचारी आणि सायकलींसाठी मार्ग तयार करणे, फ्लायओव्हरच्या ...

Work on an underpass near the international airport to solve traffic problems soon | आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अंडरपासचे काम लवकरच

आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अंडरपासचे काम लवकरच

Next

मुंबई : एमएमआरडीएकडून पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांवर टप्प्याटप्प्याने सौंदर्यीकरण, वाहतूक व्यवस्थापन, पादचारी आणि सायकलींसाठी मार्ग तयार करणे, फ्लायओव्हरच्या खाली अर्बन स्पेसेस तयार करणे अशी कामे केली जात असतानाच आता पश्चिम द्रुतगती मार्गावर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अंडरपासचे काम लवकरच सुरू होणार आहे. शिवाय कलानगर फ्लायओव्हर येथील उत्तरेकडील मार्गिकेचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूककोंडी कमी होईल आणि दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत होणार आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज यांच्यासोबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी एमएमआरडीएच्या विविध कामांचा आढावा घेतला. मुंबईत, विशेषत: मुंबई उपनगरात एमएमआरडीएमार्फत विविध कामे सुरू आहेत, याबाबत कामाच्या प्रगतीची ऑनलाइन प्रणालीद्वारे चर्चा करण्यात आली. या वेळी वरील मुद्दे मांडण्यात आले. मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या मार्गांमध्ये सुधारणा केली जाईल. नरिमन पॉइंट-कफ परेडला जोडणाऱ्या मार्गाबाबत कोळी बांधवांच्या बोटींना कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही अशा प्रकारे डिझाइन तयार करण्यासाठी कन्सल्टंट काम करत आहेत, असे नमूद करण्यात आले. वरळी-शिवडी कनेक्टर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचीही चर्चा झाली. मुंबईतील पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीला आणि कोस्टल रोड ते एमटीएचएलला जोडणारा मार्ग यातून तयार होणार आहे.

Web Title: Work on an underpass near the international airport to solve traffic problems soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.