Join us

कामाला लागा! पन कोन्त्या? आन कोनाच्या?

By admin | Published: September 20, 2014 11:12 PM

एका पक्षाचे टोलेजंग कार्यालय कार्यकत्र्यानी गजबजलेले आहे. तिथे सर्वप्रथम दादासाहेब येतात. कार्यकर्ते जल्लोष करतात.)दादासाहेब : (गळ्यात भरपूर हार आहेत. तोंडाला मलई बर्फी लागली आहे.

(एका पक्षाचे टोलेजंग कार्यालय कार्यकत्र्यानी गजबजलेले आहे. तिथे सर्वप्रथम दादासाहेब येतात. कार्यकर्ते जल्लोष करतात.)
दादासाहेब : (गळ्यात भरपूर हार आहेत. तोंडाला मलई बर्फी लागली आहे. गुलालाने चेहरा माखला आहे.) तर माङया मित्रनो! मी रात्रीच श्रेष्ठींना भेटून आलो सविस्तर चर्चा झाली, कुंडल्यांचा अभ्यास झाला आणि सांगायला आनंद होतो की, श्रेष्ठींनी उमेदवारीवरचा माझा दावा मान्य केला आणि कामाला लागा असा तोंड भरून आदेश आणि आशिर्वाद दिला तेव्हा आता या मतदारसंघातील माझी उमेदवारी पक्की समजायची आणि सगळ्यांनी कंबर कसून कामाला लागायचं. साधनसामुग्रीची काळजी करायची नाही. याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. कशाची कमी पडणार नाही, तुम्ही फक्त मी पडणार नाही याची काळजी घ्या. जयहिंद, जयमहाराष्ट्र! (कार्यकर्ते घोषणा करतात ‘ देश का नेता कैसा हो? दादासाहब जैसा हो!)
(एवढय़ात समोरून आबासाहेबांची टोलेजंग मिरवणूक येते. 
देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो? आबासाहेब जैसा हो, 
आबा साहेब जैसा हो!)
दादासाहेब : च्यामारी! हायी चिरगूट कित्याक उलथल? ता बी टोलेजंग मिरवनुकींने? मेल्यानूं ! या काय झोंगा आसा? मी जिल्हाध्यक्ष आसा आन माका या तमाशाचो काय पत्ताे नाय? माझो ठिक ! मी दिल्लीक गेलो आसा. पन तुमचो काय? तुमी तर माङया पैशानं फुकटाचो पुख्खो झोडीत व्हतां. तुमाक माघारी ठेवून मी दिल्लीक गेलो कशाक? हिथ काय चालतयं, काय नाय ते बघाचो आन् माका रिपोर्ट कराचो या तुमची डय़ुटी नसा? आत्ता ह्ये तर इलेक्शन मधे काय होईल? तुमी तर माका मारणीच घालुचो. जा! मामला काय आसा, त्येचो म्हायती काढा!
आबासाहेब : (गळ्यात भरपूर माळा गुलालाने चेहरा माखलेला तोंडाला पेढय़ाचे कण लागलेले.) मैतरानो! तुमाकां सांगूक माका लयं आनंद व्हतयं! मी दिल्लीक गेला व्हताना ! ता कशासाठी? ते तुमाक म्हायती आसा! काल राती आठ वाजता हाय कमांडशी सविस्तर चर्चा झाली आसा. आन् त्यानी माका आदेश दिलो आसा. जाऊचो ! आन् कामाक लागाचो ! मी त्याका ईचारलो ए.बी. फॉर्मचो काय? तवा त्या म्हन्ला आमी तुमाक कामाक लागाय सांगतयं ते कराचो सोडून तुमी आमाक कामाला लावाया बगतयं? ए.बी. चा झोंगा अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी पार पाडतयं, तवा हाई मतदार संघा मधार माझी उमेदवारी पक्की आता एकक्षण ईश्रंती घेऊचा नाय! आता फक्त काम आन् काम, दुसरो काय नाय! माङया आमदारकीचो ङोंडो ह्या मतदारसंघावर फडकवाचो, तवाच सुखाने खाऊचो आन झोपाचो. खरा की नाय! (सर्व कार्यकर्ते देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो? आबासाहेब जैसा हो, आबासाहेब जैसा हो!)
दादासाहेब : र्आ बारक्या आपली श्रेष्ठीं संगाक भेट किती वाजता झालो? तुका काय आठवतयं? 
बारक्या : माजो घडय़ाळा प्रमानं सातचो येळ असावी बगां! पाच-धा मिनटं इकड-तिकडं व्हतयं! का हो?
दादासाहेब : मायला! हा आब्या खरं बोलतयं म्हन्जे! आपल्या पाठोपाठ चिरगूट जाऊन भेटलो काय, हायकमांडला! हायकमांडचा काय, खरा ते कळेना रे! म्हाका बी सांगतयं कामाक लागा, आनं त्याका बी म्हन्तयं कामाक लागा! खरो कुनाचो?
काकासाहेब : दाद्या, खरो माजो! श्रेष्ठींनी माका सांगितला आसा, कामाक लागाचो! 
दादासाहेब : तुजो मिरवनूक नाय, हारतुरे नाय, तोंडाक पेडे बर्फी लागली नाय, गुलालाचो पत्ताे नाय आन् मेल्या तुजो रे काम कसो झालो? कोन ईस्वास ठेवन?
काकासाहेब : माजो मिरवनूक, हार-तूरे, पेडे-बर्फी, गुलाल समदो रिजव्र्ह ठेवला आसा! ज्या दिवसी माजो अर्ज भरायची प्रोसेशन निगन, त्या दिवसी बगं कशी टोलेजंग मिरवनूक काढतयं! तुमच्यासारख्या नौटंकी मिरवनूक मी नाही काढतलो!
आबासाहेब : आसा म्हन्ता, पन तुमी श्रेष्ठीक भेटला कौशीक?
काकासाहेब : कालच्या रातला, माजो साडेनऊचो अपाईंटमेंट आसा! अर्धातास खलबतं केला आसा आमी
आबासाहेब : अरे! काय तितरमार हायरे हायकमांड, मायला तीन तासात आपल्याच पार्टीचा तिघांना कामाला लावलयं माका तर संशय आसा, त्याचा काय भरवसा नायं आणखी दोघा-तिघाकं त्या सांगू शकतयं कामाक लागा! मायला आमचो मिरवनुकीचो खर्च फुकट? 
काकासाहेब : अरे, या इलेक्शन आसा! हाताक ए.बी. फॉर्म जवतक नई येतयं तवशीक काय खरा नसा! नाव जाहीर झालो तरी ऐन टायमाला कॅन्सल व्हतयं, बदलून टाकतयं, खरा की नाय? तवा श्रेष्ठी जवा कामाक लागा सांगतयं तवा त्याका ईचाराचो कामाक लागाचो ता खरा! पन ते कोन्त्या आन् कुनासाठी? आन मगच मिरवनूक काढाचो, समजलो!
- खिल्लारी