मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दोन शिफ्टमध्ये काम चालणार
By नितीन जगताप | Updated: October 28, 2023 23:55 IST2023-10-28T23:54:27+5:302023-10-28T23:55:02+5:30
Central Railway News: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबर पासून सीएसएमटी येथील विभागीय कार्यालयात लागू असणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दोन शिफ्टमध्ये काम चालणार
- नितीन जगताप
मुंबई - मध्य रेल्वेच्यामुंबई विभागाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबर पासून सीएसएमटी येथील विभागीय कार्यालयात लागू असणार आहे.
मुंबई रेल्वे विभागाने रेल्वे कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी निवासस्थान ते मुंबई विभागीय कार्यालय रेल्वे प्रवास टाळण्यासाठी दोन शिफ्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९. ३० ते सायंकाळी ५. ४५ पर्यंत असणार आहे तर दुसरी शिफ्ट सकाळी ११.३० ते सायंकाळी ७. ४५ पर्यंत असणार आहे. कर्मचाऱ्यांना दोनपैकी एक शिफ्ट निवडावी लागणार आहे. परंतु शिफ्टमध्ये कोणतेही बदल हे महिन्याच्या सुरुवातीला करावे लागणार आहे.. सुरळीत काम आणि चांगले नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
अडीच हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना फायदा
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयात कामवर येणाऱ्या कर्मचार्यांना दररोज लोकल गर्दीचा सामना करावा लागतो. अनेक कर्मचारी कल्याण, कसारा आणि कर्जतवरून दररोज सीएसएमटी विभागीय कार्यलयात येतात. मात्र लोकलमधील गर्दीमुळे कार्यालयात वेळेत पोहचण्यासाठी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी कार्यालयीन कामकाज दोन नवीन स्लॉट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अडीच हजारापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या गर्दीपासून मुक्ती मिळणार आहे.