५० फूट खोल बेसमेंटमध्ये पडून कामगाराचा मृत्यू
By मनीषा म्हात्रे | Published: September 7, 2022 07:34 PM2022-09-07T19:34:24+5:302022-09-07T19:34:37+5:30
पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर येथील एका बांधकाम साईटवर काम करत असताना पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन खाली बेसमेंटमध्ये ५० फूट खोल पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
चेंबूर परिसरात राहणाऱ्या ३२ रौसुना शेख यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहे. त्या मूळच्या पश्चिम बंगालच्या रहिवासी असून त्यांचे पती शुकर शेख हे कडिया काम करतात. ५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका बांधकाम ठिकाणी काम करत असताना पहिल्या मजल्यावरून खाली बेसमेंटमध्ये ५० फूट खाली पडला. बेसमेंटच्या पाण्यात पडल्याचे समजताच त्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही खबरदारी न घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी बालाजी डेव्हलपर्स, साईट सुपर वायझर विनोद तसेच साईट इंजिनियर्स सदुरद्दीन विरोधात गुन्हा नोंदवला आहे. शेख हे बालाजी डेव्हलपर्सकडे ७ वर्षांपासून काम करत होते.