कामगाराने केला ४७ हजार रुपयांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:19+5:302021-02-12T04:07:19+5:30

मुंबई : मासेमारी करणाऱ्या नौकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बोटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच मालकाला चुना लावल्याचा प्रकार कुलाबा येथे ...

The worker embezzled Rs 47,000 | कामगाराने केला ४७ हजार रुपयांचा अपहार

कामगाराने केला ४७ हजार रुपयांचा अपहार

Next

मुंबई : मासेमारी करणाऱ्या नौकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बोटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच मालकाला चुना लावल्याचा प्रकार कुलाबा येथे समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कुलाबा पोलीस तपास करत आहेत. रणजीत कुमार असे कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने ६ ते २७ जानेवारी या काळात पाणी विक्रीतून आलेल्या ४७ हजार रुपये रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले.

................................

तरुणाच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला

मुंबई : बँकेचे ॲप डाऊनलोड केलेल्या मोबाईलच्या माध्यमातून सायबर ठगाने एका तरुणाच्या बँक खात्यातील १ लाख ७१ हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार सांताक्रुझमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वाकोला पोलीस तपास करत आहेत.

.....

सराफाची फसवणूक

मुंबई : व्यावसायिकाच्या ओळखीचा फायदा घेऊन तब्बल २१ लाख रुपये किमतीचे सोने उसने घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार काळबादेवीमध्ये उघडकीस आला आहे. सोने कारागिराच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस अधिक चाैकशी करीत आहेत.

......................

Web Title: The worker embezzled Rs 47,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.