अंधेरी कामगार रुग्णालय आग प्रकरण : १० जणांचे प्राण वाचविणाऱ्या तरुणाला १ लाखाचे बक्षीस देऊन गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:09 PM2019-01-01T19:09:02+5:302019-01-01T19:10:30+5:30
आगीत १० जणांचा प्राण वाचवणारा साहसी तरुण सिद्दरामेश्वर हुमानाबादे यांचा आज केंद्रीय कामगार आणि रोजगार कल्याण राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी एक लाखाचे पारितोषिक देवून गौरव केला.
मुंबई - काही दिवसांपूर्वी अंधेरी येथील कामगार रुग्णालयात भीषण आग लागली होती. या आगीत बऱ्याच लोकांचा नाहक जीव गेला होत. दरम्यान, या आगीत सिद्दरामेश्वर हुमानाबादे या फूड डिलेव्हरी करणाऱ्या तरुणाने १० जणांचे प्राण वाचवले होते. आगीत १० जणांचा प्राण वाचवणारा साहसी तरुण सिद्दरामेश्वर हुमानाबादे याचा आज केंद्रीय कामगार आणि रोजगार कल्याण राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी एक लाखाचे पारितोषिक देवून गौरव केला.
केंद्रीय कामगार व रोजगार कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत मुंबईतील अंधेरी परिसरातील राज्य कर्मचारी विमा मंडळाच्या (इएसआयसी) रूग्णालयात १७ डिसेंबर रोजी अचानक भीषण आग लागली होती. आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत निष्पाप ११ जणांचा जीव गेला. दरम्यान साहस आणि प्रसंगावधान दाखवत फूड डिलेव्हरी बॉय सिद्दरामेश्वर हुमानाबादे याने आगीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात दिला. यावेळी हुमानाबादे यांनी १० लोकांचे प्राण वाचवले. या साहसी कार्याची दखल घेत केंद्रीय राज्य मंत्री गंगवार यांनी केंद्रीय कामगार व रोजगार कल्याण मंत्रालयात हुमानाबादे याला एक लाखाचे पारितोषिक देवून गौरव केला.
अंधेरी कामगार रुग्णालय आग प्रकरण : १० जणांचे प्राण वाचविणाऱ्या तरुणाला १ लाख रुपये देऊन गौरव
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 1, 2019