Join us

कामगारांच्या घराची जानेवारीत लॉटरी?

By admin | Published: November 03, 2015 3:09 AM

मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत घरे उभारण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यात सुमारे अडीच हजार घरांचे बांधकाम सुरु असून या घरांची लॉटरी जानेवारी

मुंबई : मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत घरे उभारण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यात सुमारे अडीच हजार घरांचे बांधकाम सुरु असून या घरांची लॉटरी जानेवारी महिन्यात काढण्याचे प्रयत्न म्हाडा अधिकाऱ्यांनी सुरु केले आहेत.मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घरे देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हाडामार्फत ६ गिरण्यांच्या जमिनीवर ६ हजार ७९४ घरे बांधण्यात येणार आहेत, तर तिसऱ्या टप्प्यात १0 गिरण्यांच्या जमिनीवर २ हजार ९११ घरे बांधण्यात येणार असून वर्षाअखेरीस १0 हजार घरे गिरणी कामगारांना वितरीत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.त्यानुसार म्हाडाने बांधकाम अंतिम टप्प्यात आलेल्या इमारतींमधील घरांची लॉटरी काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आगामी वर्षात ही लॉटरी काढण्याचे प्रयत्न म्हाडा अधिकारी करत आहेत. तसेच एमएमआरडीएचीही घरे गिरणी कामगारांना मिळणार असल्याने हजारो गिरणी कामगारांना दिलासा मिळणार आहे.