Join us

पश्चिम रेल्वे मार्गावरील वर्कशॉप १ जूनपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 5:53 PM

३० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

 

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ, महालक्ष्मी वर्कशॉप एक जूनपासून सुरु होणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. पश्चिम रेल्वेने वर्कशॉपमध्ये ३० टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रेल्वे मंत्रालयाने १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेऱ्या सुरु करण्याची घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर्कशाॅप मधील कर्मचारी, देखभाल दुरूस्तीचे कर्मचारी, रेल्वे स्टेशनवर काम करणारे कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात आले आहे.   

लोअर परळ वर्कशाॅपमधील बोगी व्हिल शाॅप, अंडरफ्रेम, रोलर बेरिंग आणि महालक्ष्मी वर्कशाॅप सुरु होणार आहेत. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सुरु केलेली शटल सेवा, लोकल सेवा यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग नियमाचे उल्लंघन होत आहे. परिणामी, कोरोनाची लागण होण्याची भीती रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :रेल्वेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई