वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली मुंबईच्या उपमहापौरांच्या कोरोना कार्याची दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 11:34 AM2021-08-07T11:34:22+5:302021-08-07T11:35:02+5:30

मुंबईचे उपमहापौर अ‍ॅड. सुहास चंद्रकांत वाडकर यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांनी घेतली आहे.

the world Book of Records london noted the corona work of the deputy mayor of mumbai | वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली मुंबईच्या उपमहापौरांच्या कोरोना कार्याची दखल

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली मुंबईच्या उपमहापौरांच्या कोरोना कार्याची दखल

googlenewsNext

मुंबई:मुंबईचे उपमहापौर अ‍ॅड. सुहास चंद्रकांत वाडकर यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांनी घेतली आहे.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन कड़ून “सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट” देऊन अ‍ॅड. सुहास वाडकर यांचा गौरव करण्यात आला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन चे यूरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये कोरोनामुक्ती साठी जनजागृति केली जात आहे. तसेच कोरोना मुक्ती साठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड) ने व्यक्ती व संस्था ना सम्मानित करण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन चे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी उपमहापौर अ‍ॅड. सुहास  वाडकर यांना पालिका मुख्यालयात सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड) ने  काल सम्मानित केले. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वाडकर यांचे त्यांच्या महापौर निवासस्थानी या पुरस्काराबद्धल अभिनंदन केले.

उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर  व शिवसेना पक्ष प्रतोद,आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली अँड.सुहास वाडकर यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये नगरसेवक यानात्याने अनेक विकासकामे करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
 

Web Title: the world Book of Records london noted the corona work of the deputy mayor of mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.