नवी मुंबईत उभे राहणार जागतिक दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:02+5:302021-06-06T04:06:02+5:30

मुख्यमंत्र्यांकडून सहकार्याचे आश्वासन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रत्न आणि आभूषण उद्योगाला चालना मिळावी यासाठी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ...

A world class Gems and Jewelery Park will be set up in Navi Mumbai | नवी मुंबईत उभे राहणार जागतिक दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क

नवी मुंबईत उभे राहणार जागतिक दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क

googlenewsNext

मुख्यमंत्र्यांकडून सहकार्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रत्न आणि आभूषण उद्योगाला चालना मिळावी यासाठी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे. रत्न आणि आभूषण उद्योग- व्यापारात मुंबई संपूर्ण देशात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवरही या उद्योगात मुंबईचे नाव आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी निर्यातही मुंबई पर्यायाने महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्रात मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी या क्षेत्रातील मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे येथे आर्थिक उलाढाल आणि सोबतच रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.

महाराष्ट्राचे हे स्थान अबाधित राखत असतानाच आता परकीय गुंतवणूक देखील आणता येणार आहे. बाहेरचे उद्योग येथे आल्यामुळे आणखी मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन, या जेम्स अँड ज्वेलरी पार्कच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्क (आयजेपीएम) जागतिक पातळीवर उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ठरेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले.

या पार्कच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत या पार्कबाबत रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे (जीजेईपीसी) अध्यक्ष कॉलीन शाह यांनी सादरीकरण केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष कॉलीन शाह, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भन्साली, परिषदेचे उपाध्यक्ष विपुल शाह, सदस्य रसेल मेहता, व्यवस्थापकीय संचालक एस. रे यांचीही उपस्थिती हाेती.

फाेटाे कॅप्शन : जीजेईपीसीचे अध्यक्ष कॉलीन शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्रींची मूर्ती भेट दिली. यावेळी उपस्थित उपाध्यक्ष विपुल शाह, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भन्साली व सदस्य रसेल मेहता.

...................................

Web Title: A world class Gems and Jewelery Park will be set up in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.