सफाई कामगारांचा संसार अखेर खुराड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:06 AM2019-11-07T04:06:51+5:302019-11-07T04:07:17+5:30

८६ कर्मचारी लाभार्थी : आश्रय योजनेंतर्गत मिळणार १६० चौ. फुटांचे घर

The world of cleaning workers is finally in the open | सफाई कामगारांचा संसार अखेर खुराड्यात

सफाई कामगारांचा संसार अखेर खुराड्यात

Next

मुंबई : आश्रय योजनेंतर्गत महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळणार आहे. या योजनेंतर्गत सफाई कामगारांची पहिली इमारत फोर्ट परिसरात उभी राहिली आहे. ८६ सफाई कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये प्रत्येकी जेमतेम १६० चौ. फुटांचे घर मिळणार आहे. ही जागा अपुरी असून, त्यामध्ये वाढ करून किमान अडीचशे चौ. फुटांची जागा मिळावी, अशी मागणी केली जात आहे. यामध्ये कोणतीही सुधारणा प्रशासनाने केली नसल्याची तक्रार स्थानिक नगरसेविकेने स्थायी समितीकडे केली आहे.

मुंबई स्वच्छ ठेवणाºया सफाई कामगारांच्या डोक्यावर हक्काचे छत नाही. घनकचरा व्यवस्थापन खात्यात काम करणाºया २८ हजार सफाई कामगारांना घर देण्याचा निर्णय सन २००९ मध्ये प्रशासनाने घेतला. २०१२ मध्ये यासाठी चार सल्लागार नेमण्यात आले़ गेल्या सात वर्षांमध्ये केवळ कुलाबा आणि दादर येथील प्रकल्पाने आकार घेतला आहे. फोर्ट परिसरात कालिकत कोचीन स्ट्रीट येथे १३६ पैकी ८६ सफाई कर्मचाºयांना आश्रय योजनेंतर्गत घर मिळणार आहे. आठ मजल्यांच्या इमारतीमध्ये मंजूर करण्यात आलेले घर केवळ १६० चौ.फुटांचे आहे, ही बाब स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी बुधवारी स्थायी समितीच्या निदर्शनास आणली.
हरकतीच्या मुद्द्याद्वारे ही गंभीर बाब त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली. हा निर्णय घेणाºया सनदी अधिकाºयांच्या निवासस्थानातील प्रसाधनगृहदेखील यापेक्षा आकाराने मोठे असेल, अशी नाराजी सानप यांनी व्यक्त केली. १६० फुटांच्या घरात शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकगृहाचे नियोजन कसे करण्यात येणार? एवढी कमी जागा देणार असेल, तर या योजनेला अर्थच काय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सफाई कामगारांना अडीचशे चौ. फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणी करूनही अधिकारी त्याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रार त्यांनी केली. हा हरकतीचा मुद्दा राखून धरत याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

सात वर्षांत केवळ एकच इमारत
च्आश्रय योजनेंतर्गत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात काम करणाºया कर्मचाºयांना हक्काचे घर देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
च्२००९ मध्ये ही योजना जाहीर झाली असून, २८ हजार सफाई कामगारांना त्याचा लाभ मिळणार आहे.
च्सात वर्षांमध्ये केवळ फोर्ट परिसरातील कोचीन स्ट्रीट येथे पहिला इमारत उभी राहत आहे. येथे ८६ कामगारांना १६० चौ. फुटांची जागा मिळणार आहे.
 

Web Title: The world of cleaning workers is finally in the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.