Join us

जगप्रसिद्ध छायाचित्रकार सांड्रो मिलर व मार्क एडवर्ड हैरिस पहिल्यांदाच भारतात; रचना दर्डा यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 6:05 AM

दि. ३ मार्च रोजी दु. ४ ते ६ या वेळेत वरळी येथील नेहरू सेंटर, हॉल ऑफ हार्मनी येथे परिसंवाद आयाेजित केला आहे. सांड्रो मिलर व मार्क एडवर्ड हॅरिस हे दोनही दिग्गज, फोटोग्राफीमधील आपला अनुभव, छंद ते व्यवसाय, छायाचित्रणातील झालेले बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि छायाचित्रण यावर छायाचित्रकारांना मार्गदर्शन करत संवाद साधतील.

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या दिग्गजांची अलौकिक छायाचित्रे काढणारे प्रख्यात छायाचित्रकार सांड्रो मिलर व मार्क एडवर्ड हॅरिस यांना चित्रकार रचना दर्डा यांनी भारतात खास निमंत्रित केले आहे. हे दोन दिग्गज छायाचित्रकार प्रथमच भारतात येत आहेत.  

दि. ३ मार्च रोजी दु. ४ ते ६ या वेळेत वरळी येथील नेहरू सेंटर, हॉल ऑफ हार्मनी येथे परिसंवाद आयाेजित केला आहे. सांड्रो मिलर व मार्क एडवर्ड हॅरिस हे दोनही दिग्गज, फोटोग्राफीमधील आपला अनुभव, छंद ते व्यवसाय, छायाचित्रणातील झालेले बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि छायाचित्रण यावर छायाचित्रकारांना मार्गदर्शन करत संवाद साधतील. फुजी फिल्म इंडिया, प्रो फोटो व नॅनलाईट यांच्या सहयोगाने या भारत भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. 

८ मार्च रोजी ‘हर स्टोरी मेसों’च्या सहयोगाने परिसंवादाचे तर ४ ते ६ मार्च दरम्यान स्टुडिओ अँड पोट्रेट या कार्यशाळेचे आयोजन इफ बी, बॅलार्ड इस्टेट येथे करण्यात आले आहे. तसेच, मुंबई, वाराणसी व जयपूर येथे १० ते १५ मार्च दरम्यान छायाचित्रणाशी संबंधित विशेष कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. छायाचित्रकार, चित्रकार, राज्यसभेचे माजी खासदार व लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्या स्नुषा रचना दर्डा यांनी छायाचित्रकारांना दिग्गजांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे, यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. 

सांड्रो मिलर यांनी : प्रसिद्ध हॉलिवूड सिने अभिनेते अल पचीनो, डेनिस हॉपर, विलियम डॅफो, जॉन माल्कोविच, डेविड श्वीमर, जेसिका लँग, बॉक्सर मोहम्मद अली, मॉडेल सिंडी क्रॉफर्ड, बास्केटबॉल खेळाडू माइकल जॉर्डन, कोबी ब्रायंट, लेब्रों जेम्स, स्कॉटी पिप्पीन यांची तर 

मार्क एडवर्ड हॅरिस यांनी : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर, प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग, सिने अभिनेते टॉम क्रूज, क्लिंट ईस्टवुड, ब्रूस विलिस, कियानू रिव्स, हॅरिसन फोर्ड व द रोलिंग स्टोनस् रॉक बॅण्डचे मिक जॅगर यांची छायाचित्रे काढली आहेत. 

टॅग्स :मुंबई