जागतिक डास दिन (जोड)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:09 AM2021-08-20T04:09:28+5:302021-08-20T04:09:28+5:30
* डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. तर मलेरियाच्या डासांची उत्पत्ती ...
* डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. तर मलेरियाच्या डासांची उत्पत्ती विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कूलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात होते.
* टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे पिंप, मनी प्लांट - बांबू यासारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या, यासारख्या विविध वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचल्यास त्यात डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरित नष्ट कराव्यात.
* घरामध्ये व घराशेजारील परिसरात साठविलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस घरातील पाणी साठवण्याची भांडी कोरडी ठेवून कोरडा दिवस पाळावा. पाणी साठविण्याचे पिंप, ड्रम हे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवावे. यासाठी हे पिंप पूर्णपणे उलटे करून ठेवल्यानंतर काही वेळाने हे पिंप कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावे.