जागतिक न्यूमोनिया जनजागृती दिनविशेष : न्यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 05:47 AM2018-11-12T05:47:25+5:302018-11-12T05:47:49+5:30

प्रमाण चिंताजनक : उपचार पुरवण्यात असमर्थ असल्याचे उघड

World Pneumonia: Awareness day: Pneumonia, diarrhea caused the most deaths in India! | जागतिक न्यूमोनिया जनजागृती दिनविशेष : न्यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!

जागतिक न्यूमोनिया जनजागृती दिनविशेष : न्यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!

Next

मुंबई : वर्ष २०१६ मध्ये जगभरात झालेल्या पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू न्यूमोनिया आणि डायरियामुळे झाले होते. भारतात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. न्यूमोनिया व डायरियामुळे सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या १५ देशांचा अभ्यास अहवालात नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. हे प्रमाण सर्वाधिक आढळणाºया देशांतील आरोग्यव्यवस्था असुरक्षित वर्गातील मुलांना उपचार पुरवण्यात असमर्थ असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

सोमवार, १२ नोव्हेंबर रोजी साजरा होणाºया जागतिक न्यूमोनिया जनजागृती दिनाच्या पार्श्वभूमीवर १० वा न्यूमोनिया अ‍ॅण्ड डायरिया प्रोग्रेस रिपोर्ट जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल आॅफ पब्लिक हेल्थमधील इंटरनॅशनल व्हॅक्सिन अ‍ॅक्सेस सेंटरने नुकताच प्रसिद्ध केला. यात न्यूमोनिया व डायरिया आजारांनी सर्वाधिक बालमृत्यू होणाºया १५ देशांतील न्युमोनिया आणि डायरिया प्रतिकारासंदर्भातील प्रगतीबाबत विवेचन करण्यात आले आहे.
या आजारांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपायांमध्ये स्तनपान, लसीकरण, वैद्यकीय सेवेची उपलब्धता, प्रतिजैवकांचा वापर, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) व झिंक पूरके देणे हे उपाय प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. लसीकरणाच्या व्याप्तीबाबत हे देश प्रगती करत असले, तरी लहान मुलांमधील आजारांवर उपचार करण्यात ते प्रचंड प्रमाणात कमी पडत आहेत, असे गेल्या दहा वर्षांपासून प्रसिद्ध होणाºया अहवालात म्हटले आहे. विशेषत: दुर्गम भागात राहणाºया, गरीब आणि मागास समुदायांतील मुलांना होणारे आजार हाताळण्यात हे देश कमी पडत
आहेत.
दरम्यान, २०१६ साली देशात १ लाख ५८ हजार १७६ न्यूमोनियाचे बालमृत्यू झाले. तर डायरियामुळे १ लाख २ हजार ८१३ लहानग्यांचा बळी गेला आहे.

उपचार पद्धतींमधील दरी दूर करणे महत्त्वाचे

न्यूमोनियाचे प्रमाण कमी होण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये बाळांचे वजन कमी असणे, त्यांना पोषक आहार न मिळणे, अस्वच्छता, प्रदूषण आणि काही ठिकाणी गरज नसताना देण्यात येणारी प्रतिजैविके या गोष्टींचा अडसर आहे. न्यूमोनिया विषाणू किंवा जीवाणू संसगार्मुळे होतो. गोवर झाल्यानंतर काही बाळांना न्यूमोनिया होत असल्याचे बघायला मिळते. न्यूमोनियावरील ‘हिब’ (हिमोफिलस इन्फ्लूएन्झा) नावाची लस सर्व बाळांपर्यंत पोहोचली पाहिजे. शहरी व ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचे अंतर कमी करण्यावर भर दिला पाहिजे. - डॉ. एस. के. नारायणन, बालरोगतज्ज्ञ.

जागतिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे
अहवालातील १५ देशांपैकी आठ देश न्युमोनिया व डायरियापासून संरक्षण तसेच या आजारांवर उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटना तसेच युनिसेफच्या न्यूमोनिया व डायरिया प्रतिबंध व नियंत्रणासाठीच्या एकात्मिक जागतिक कृती योजनेने (जीएपीपीडी) घालून दिलेल्या १० उपायांची पूर्तता करण्यातच कमी पडत आहेत. १५ देशांपैकी दोन देश किमान चार लसींच्या व्याप्तीची उद्दिष्टे ९० टक्क्यांपर्यंत साध्य करू शकले आहेत. पण उपचारांच्या व्याप्तीमध्ये ९० टक्क्यांचा स्तर एकही देश गाठू शकलेला नाही.
- केट ओब्रायन, कार्यकारी संचालक,
इंटरनॅशनल व्हॅक्सिन अ‍ॅक्सेस सेंटर, ब्लूमबर्ग स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ.

संमिश्र प्रगती
भारताची प्रतिबंधाबाबतची प्रगती संमिश्र आहे. हिमोफिलिअल इन्फ्लुएंझा टाइप बी लशींची व्याप्ती वाढवून, तसेच २०१६ मध्ये रोटाव्हायरस लसीकरणाचे प्रमाण वाढवून भारताने गेल्या वर्षीच्या अहवालात चांगली मुसंडी मारली होती. २०१७ मध्ये आणलेले न्युमोकोकल काँज्युगेट वॅक्सिन (पीव्हीसी) आतापर्यंत फक्त सहा राज्यांच्या लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. ही लस सर्व राज्यांपर्यंत पोहोचवण्याचा विचार झाला पाहिजे. दुसºया बाजूला केवळ २० टक्के मुलांना डायरियासाठी ओआरएस उपचार मिळत असून, एकूण मुलांना महत्त्वाचे उपचार मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
 

Web Title: World Pneumonia: Awareness day: Pneumonia, diarrhea caused the most deaths in India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.