Join us

जागतिक नदी दिन विशेष, मुंबईतील चार नद्या होणार प्रदूषणमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 3:27 AM

महापालिका तयार करणार कृती आराखडा : ओशिवरा, पोयसर, दहिसर, मिठी नद्या पुनर्जीवित होणार

शेफाली परब-पंडित 

मुंबई : एके काळी पिण्याव्यतिरिक्त कामाचा स्रोत असलेल्या मुंबईतील चार नद्या शहरीकरणाबरोबरच रूप बदलत गेल्या. नाल्यांचे स्वरूप आलेल्या या नद्यांची घुसमट होऊ लागली आणि तेरा वर्षांपूर्वी सर्व मर्यादा ओलांडून त्या वस्तीत शिरल्या. या उद्रेकाला एक तप लोटला, पण त्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे या नदींना पुनर्जीवित व प्रदूषणमुक्त करण्यासाठी लवकरच कृती आराखडा तयार होणार आहे.

२६ जुलै २००५ च्या पुरात मिठी, ओशिवरा, पोयसर आणि दहिसर या चार नद्या ओसंडून वाहत पश्चिम उपनगराला तडाखा दिला होता. या पुरानंतर स्थापन झालेल्या सत्यशोधक समितीने त्यांची रुंदी व खोली वाढविणे, त्यातील गाळ काढणे, तसेच संरक्षण भिंत बांधण्याची शिफारस केली. या प्रकल्पाला सुरुवात झाली. मात्र, अनेक तांत्रिक अडचणींमुळे वेग मिळाला नाही. नद्यांच्या परिसरातील झोपड्यांचे पुनर्वसन रखडल्यामुळे काही ठिकाणी कामे खोळंबली आहेत.मुंबईला मगरमिठीत घेणाऱ्या मिठी नदीच्या कामाला प्राधान्य मिळाले. मात्र, इतर तीन नद्या दुर्लक्षित राहिल्याने त्यांचे काम संथगतीने सुरू राहिले.नद्यांना पुनर्जीवित करण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार, महापालिकेने या नद्यांचे पाणी शुद्ध करणे व पुनर्जीवित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यातील चार महिने पुनर्वसन व नद्यांच्या अभ्यासाचे काम लांबणीवर पडले होते. पुढच्या महिन्यापासून या कामाला सुरुवात होईल, असे पर्जन्य जलवाहिन्या विभागातील सूत्रांनी सांगितले.मिठी नदीवर डिस्चार्ज गेट उभारण्याची मागणीच्मिठी नदीवर पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विहार तलाव आणि पवई तलाव यांच्या दरम्यान विसर्गद्वार (डिस्चार्ज गेट) उभारण्याची मागणी प्रभाग क्रमांक १६८ च्या नगरसेविका सईदा खान यांनी केली आहे. डिस्चार्ज गेट उभारल्यास विहार व पवई या तलावांमधून होणाºया पाण्याच्या विसर्गावर व पर्यायाने मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढण्यावरही नियंत्रण ठेवणे शक्य आहे.च्अशा तºहेने पूरपरिस्थितीवर नियंत्रण होईल, असे सईदा खान यांनी सांगितले. मिठी नदीच्या आजूबाजूच्या परिसरात सायकल ट्रॅक उभारण्याची मागणीदेखील खान यांनी केली आहे.च्औद्योगिक वसाहत व झोपडपट्टी व सोसायट्यांमधील सांडपाणी, आसपासच्या परिसरातून टाकण्यात येणारा कचरा, प्लॅस्टिकमुळे मुंबईतील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे. त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे.च्मिठी आणि दहिसर नदीचे रुंदीकरण व प्रदूषणमुक्तीचे काम सुरू आहे, अन्य दोन नद्यांचे काम संथगतीने सुरू आहे.च्सल्लागारांना नद्यांचा अभ्यास करून त्यांच्या पुनर्जीवनासाठी पर्यावरणपूरक उपाय योजना सुचवायच्या आहेत.च्पाण्याचा दर्जा वाढविणे, औद्योगिक वसाहत व झोपडपट्टीतून नद्यांमध्ये सांडपाणी सोडणे रोखणे आणि संरक्षक भिंत बांधणे, असे या कामाचे प्राथमिक स्वरूप आहे.२०१८-१९ या आर्थिक वर्षात २०५.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.च्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नदी पुनर्जीवन प्रकल्पाला आपला पाठिंबा दर्शवित तसा संदेश देणारा व्हिडीओही काढला होता.च्मिठी नदीचे रुंदीकरण व खोलीकरणावर पालिकेने ६५९ कोटी रुपये खर्च केले आहेत.एकूण २३ हजार ९४९ मीटरची संरक्षण भिंत या नद्यांवर बांधण्यात आली आहे. मात्र, अतिक्रमणामुळे १६ हजार ६१८ मीटरचे काम रखडले आहे.अशी आहे मुंबईतील नद्यांची ओळखदहिसर नदी -च्संजय गांधी राष्ट्रीय उद्यानतून वाहणाºया तुळशी नदीचे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या मार्गातून दहिसर नदीचा उगम होतो.च्नॅशनल पार्क, श्रीकृष्णनगर, दौलतनगर, लेप्रसी कॉलनी, कांदर पाडा, संजयनगर आणि दहिसर गावठाण असा १२ किलोमीटर प्रवास करून, मानोरी खाडी मार्ग ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते.च्पूर्वी या नदीच्या काठी चित्रपटाचे चित्रीकरणही झाले आहे. मात्र, आता ही नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. औद्योगिक वसाहत, झोपडपट्टी आणि पर्जन्य जलवाहिनीतील सांडपाणी या नदीमध्ये मिसळले जाते.च्२००५ मध्ये आलेल्या पुरानंतर या नदीची रुंदी वाढविणे, संरक्षण भिंत बंधणे आणि प्रदूषणमुक्त करण्याचे काम सुरू आहे.पोयसर नदी -च्संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सुरू होणारी ही नदी मार्वे खाडीमार्गे अरबी समुद्राला जाऊन मिळते.च्पूर्वी या नदीचे पाणी शुद्ध असल्याने पिण्यासाठी व इतर कामांसाठी वापरले जात होते, तसेच गणेशमूर्तींचेही येथे विसर्जन होत होते. आता ही नदी प्रदूषित असून, नाल्याचे स्वरूप आल्याने गणेशमूर्तीचे विसर्जन व पाण्याचा वापर बंद करण्यात आला आहे.च्मात्र, अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे या नदीला खाडीचे स्वरूप आले. २००५ मध्ये या नदीने पश्चिम उपनगराला तडाखा दिला होता.च्नदीचे प्रदूषित पाणी घराघरात घुसल्यामुळे रोगराई पसरली होती.ओशिवरा नदी - गोरेगाव पूर्व, आरे वसाहतीतून उगम होणारी ही नदी गोरेगाव येथील डोंगराळ भागातून वाहत मालाडच्या खाडीला जाऊन मिळते.च्२००५ मध्ये आलेल्या पुरानंतर या नदीचे रुंदीकरण व प्रदूषणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.मिठी नदी - मुंबईतील सर्वात मोठी व महत्त्वाच्या या नदीला माहिमची नदी म्हणूनही ओळखले जाते. पवई आणि विहार तलावातून सोडण्यात येणाºया जादा पाण्यातूनच ही नदी वाहते. पावसाळ्यात या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास मुख्यतो कुर्ला व आसपासच्या परिसराला धोका निर्माण होतो. १५ कि. मी. लांब असलेली ही नदी माहिम खाडीद्वारे अरबी समुद्राला जाऊन मिळते. २००५ मध्ये आलेल्या पुरानंतर या नदीच्या रुंदीकरणाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. महापालिका आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाद्वारे या नदीचे रुंदीकरण, संरक्षण भिंत, प्रदूषणमुक्त करणे आदी काम सुरू आहे.

टॅग्स :मुंबईनदी