Join us

पश्चिम उपनगरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

By मनोहर कुंभेजकर | Published: August 09, 2023 6:16 PM

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जातो.

मुंबई: ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जातो. गोरेगाव (पूर्व) आरे कॉलनी येथे मुंबई विभागीय आदिवासी कॉंग्रेसच्या वतीने आदिवासी शहीद बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुंबई कॉंग्रेस महासचिव संदेश कोडविलकर,  उत्तर पश्चिम जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष क्लाइव्ह डायस, मुंबई आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे, आदिवासी कॉंग्रेस उपाध्यक्ष कैलास पटेल,आदिवासी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष ज्योती पटेल, सुरेश लाखात, सुनिधि कुमरे, सुषमा दवडे यांच्या उपस्थितीत आदिवासी शहीद बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.

  मणिपूर येथील आदिवासी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत आदिवासी समाज बांधवांनी आपल्या पारंपारिक वेशभूषात निषेध व्यक्त केला. ॲब ओरीजन फ्रंट असोसिशन यांच्या वतीने मणिपूर येथील आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी  बामनडाया पाडा ते खाणी पाडा मरोळ या ठिकाणी आदिवासी बांधवानी मूक मोर्चा काढला. 

मुंबईत आदिवासी दिनानिमित्त आदिवासी हक्क संवर्धन समिती ,संयुक्त आदिवासी उत्सव समिती, मुंबई नेशनल आदिवासी पीपल्स फाउडेशन ,ॲब- ओरिजिन फ्रंट असोशिएशन या विविध संघटनांनी  थाटात हा उत्सव साजरा केला. यावेळी मुंबईतीलआदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मरोळ येथील नवापाडा येथे अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राच्या स्थानिक आमदार ऋतुजा लटके यांच्या निधीतून आदिवासी समाज सेवक अनिल तेली चौकाचे उदघाटन आमदार व विभागप्रमुख अँड.अनिल परब यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार ऋतुजा लटके, सुनिल कुमरे उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई