जगभरातील ‘एक्सपॅट्स’ना आपल्या मुंबापुरीची भुरळ! सर्वाधिक पगार; जागतिक पातळीच्याही दुप्पट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:27 AM2018-02-28T00:27:10+5:302018-02-28T00:27:10+5:30
भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी असलेली मुंबई नगरी आपली मातृभूमी सोडून अन्यत्र काम करणा-या अनिवासी कर्मचा-यांचे सर्वांत आवडते ठिकाण ठरली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अशा कर्मचा-यांस एक्सपॅट्स (एक्सपॅट्रिएट्सचे लघुरूप) म्हटले जाते. तसेच त्यांना मिळणा-या वेतनास एक्सपॅट सॅलरी म्हटले जाते.
मुंबई : भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी असलेली मुंबई नगरी आपली मातृभूमी सोडून अन्यत्र काम करणा-या अनिवासी कर्मचा-यांचे सर्वांत आवडते ठिकाण ठरली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अशा कर्मचा-यांस एक्सपॅट्स (एक्सपॅट्रिएट्सचे लघुरूप) म्हटले जाते. तसेच त्यांना मिळणा-या वेतनास एक्सपॅट सॅलरी म्हटले जाते. एक्सपॅट सॅलरीच्या बाबतीत मुंबई जगात सर्वोच्च स्थानी असल्याचे ‘एचएसबीसी बँक इंटरनॅशनल लिमिटेड’ने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे शहर असलेल्या मुंबईत विदेशी कर्मचाºयांना सरासरी २,१७,१६५ डॉलर वेतन मिळते. जागतिक पातळीवरील विदेशी कर्मचाºयांच्या सरासरी ९९,९0३ डॉलर वेतनाच्या ते दुप्पट आहे. त्यामुळे विदेशात काम करण्याची तयारी असलेल्यांसाठी मुंबापुरी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.
‘एचएसबीसी एक्सपॅट’चे प्रमुख डीन ब्लॅकबर्न यांनी सांगितले की, आपले करिअर अधिक उंचीवर घेऊन जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाºया एक्सपॅट कर्मचाºयांसाठी अमेरिका आणि ब्रिटन येथील वित्तीय व तंत्रज्ञान क्षेत्रे प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. युरोपीय तंत्रज्ञान केंद्र असलेले डब्लिन एक्सपॅट रोजगार संधीच्या बाबतीत टॉप-५ मध्ये आहे. एक्सपॅट सॅलरीच्या बाबतीत मात्र ते जागतिक सरासरीच्या खाली आहे.
सर्वोच्च एक्सपॅट सॅलरी देणाºया देशांत पूर्वी सर्वोच्च स्थानी असलेल्या स्वीत्झर्लंडची दोन शहरे टॉप-५ मध्ये आहेत. झुरिक आणि जिनेव्हा ही ती दोन शहरे होत. झुरिक तिसºया स्थानी, तर जिनेव्हा पाचव्यास्थानी आहे. स्वीत्झर्लंडमधील राहण्याचा खर्च खूपच अधिक असला तरी कर कमी असल्यामुळे तेथे राहणे परवडते, असे एक्सपॅट्सचे मत आहे.
कामाच्या संधी मात्र कमी-
टॉपटेन एक्सपॅट सॅलरी मानांकनात इतरही काही आशियाई शहरे समाविष्ट आहेत. त्यात शांघाय, जकार्ता आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. १८ दशलक्ष लोकांचे घर असलेल्या मुंबईत एक्सपॅट कर्मचाºयांसाठी कामाच्या संधी मात्र फारच कमी आहेत. याबाबतीत मुंबईला फारच खालचे मानांकन मिळाले आहे. लंडन, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि बर्मिंगहॅम ही शहरे मुंबईच्या पुढे आहेत, असे एचएसबीसीने म्हटले आहे.