मुंबई : भारतीय औषधी ही नैसर्गिक पद्धतीने बनविण्यात येत असून भारतीय औषधांचा प्रसार जगभर करण्यात यावा, असे मत जर्मनी येथील डॉ. ऊलरीच रेंडोल यांनी व्यक्त केले आहे. नैसर्गिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या या औषधांमध्ये अनेक गुण असून ते मोठमोठ्या आजारांवर नियंत्रण ठेवत असल्याचेही रेंडोल यांनी सांगितले. भारत भेटीवर असताना मुंबईत रविवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.रेंडोल यांनी मुंबई येथे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक रिसर्च सेंटर्स, रुग्णालये तसेच विविध संस्थांना भेटी दिल्या. डॉ. मुनीर खान यांनी बनविलेल्या औषधांची पाहणी करताना ते म्हणाले, भारतीय औषधांची दखल जर्मनीने घेतली आहे. मात्र अद्याप जगभरात त्यांच्या प्रसाराची गरज आहे.या वेळी डॉ. मुनीर खान म्हणाले, देशात आयुर्वेदिक औषधांना मोठी मागणी आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडिया या संकल्पनेतून आयुर्वेदिक औषधे बनवत आहोत. लवकरच येथील औषधांना जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय औषधांचा प्रसार जागतिक स्तरावर करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 1:59 AM