वरळी ते बीकेसी सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:05 AM2021-06-29T04:05:57+5:302021-06-29T04:05:57+5:30

कलानगर उड्डाणपुलाची आणखी एक मार्गिका खुली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (एमएमआरडीए) सोमवारी ...

Worli to BKC Susat | वरळी ते बीकेसी सुसाट

वरळी ते बीकेसी सुसाट

Next

कलानगर उड्डाणपुलाची आणखी एक मार्गिका खुली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (एमएमआरडीए) सोमवारी कलानगर उड्डाणपुलाची आणखी एक मार्गिका खुली करण्यात आली. चार महिन्यांत प्राधिकरणाने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्ससह वरळी-वांद्रे सी-लिंक जोडणाऱ्या या उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण केले.

कलानगरच्या तीन दिशांच्या उड्डाणपुलाची ही सर्वात लांब मार्गिका आहे. एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रमुख निवासी, व्यावसायिक आणि व्यावसायिक केंद्रापर्यंत वरळी-वांद्रे सी-लिंकच्या ७.५० मीटर रुंदीच्या ८०४ मीटर लांबीच्या मार्गिकेचे काम पूर्ण केले आहे.

दरम्यान, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते वांद्रे-वरळी सी-लिंक हा मार्ग २१ फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी खुला झाला होता. या उड्डाणपुलाची लांबी ६५३ मीटर आणि रुंदी ७.५० मीटर आहे. वांद्रे-वरळी समुद्रापर्यंत जाण्यासाठी सायन-धारावी जंक्शनपासून ३४० मीटर रुंदीच्या दोन मार्गिका आहेत.

या प्रकल्पाची मूळ किंमत १६३.०८ कोटी होती. मेट्रो लाइन-२ ब वरील कामांमुळे उड्डाणपुलाचा काही भाग कमी करण्यात आला. त्यामुळे उड्डाणपुलाची सुधारित किंमत १०३.०८ कोटी रुपये आहे.

* वेळ वाचणार

कलानगर येथे पश्चिम द्रुतगती मार्ग, वांद्रे-वरळी सी-लिंक / एस.व्ही. रोड, सायन / धारावी रोड, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स रस्ता व इतर दोन रस्ते एकमेकांना जोडतात.

येथे प्रचंड वाहतूककोंडी होते. यावर मात करण्यासाठी कलानगर उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले. या उड्डाणपुलामुळे वाहतूककाेंडी टाळण्यास मदत हाेईल. वाहतुकीच्या सुमारे १० मिनिटांच्या वेळेची बचत होईल.

* काेराेनाचाही कामावर परिणाम

खारफुटीसाठी वनविभागाची परवानगी, झाडे तोडण्यास परवानगी, वाहतूक पोलीस विभागाची परवानगी, रस्त्यांवरील विविध सेवा मार्ग काढणे व ते पुन्हा कार्यान्वित करणे, सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये स्थानांतरित करणे, मेट्रो लाइन-२ ब चे एकात्मिक लेआउट तयार करणे. यामुळे कामाच्या प्रगतीवर परिणाम झाला. कोराेनामुळे घातलेले निर्बंध, लॉकडाऊन तसेच कामगारांच्या स्थलांतरामुळे कामावर परिणाम झाला.

................................................

Web Title: Worli to BKC Susat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.