Join us

वरळीत रात्र बाजारपेठ; अर्कचित्रे, शिल्पकलेचे स्टॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:11 AM

महापालिकेच्या आर्टिस्ट आॅफ टॅलेंट स्ट्रीट काळाघोडा (खुले व्यासपीठ) या उपक्रमांतर्गत आणि महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) साहाय्याने वरळी येथे १३ आणि १४ जानेवारी

मुंबई : महापालिकेच्या आर्टिस्ट आॅफ टॅलेंट स्ट्रीट काळाघोडा (खुले व्यासपीठ) या उपक्रमांतर्गत आणि महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) साहाय्याने वरळी येथे १३ आणि १४ जानेवारी रोजी आयोजित मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये रात्र बाजारपेठ भरविण्यात आली होती. सायंकाळी ४ ते दुसºया दिवशी पहाटे ४ या वेळेत ही बाजारपेठ भरविण्यात आली होती. बाजाराला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. वरळीतील बाजारामध्ये ३५ स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्समध्ये अर्कचित्रे, शिल्पकला, मातीच्या वस्तू, वारली चित्रकला, दागिने, पपेट मेकिंग, जादूचे खेळ आणि बॉलीवूडसाठी आॅडिशन असे कलाकारांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यात आले.महापालिकेच्या आर्टिस्ट आॅफ टॅलेंट स्ट्रीट काळाघोडा या उपक्रमांतर्गत शहरातील उदयोन्मुख कलाकारांना कलेचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या कलाकारांसाठी आठवड्याच्या शेवटी म्हणजे ‘वीकएन्डला’ मुंबईतील अ-निवासी भागांमध्ये रात्र बाजारपेठा तयार करून दिल्या जाणार आहेत. त्यानुसार, पहिला प्रयोग वरळी येथे १३ आणि १४ जानेवारी रोजी करण्यात आला. त्यानंतर, १९ आणि २० जानेवारी रोजी मालाडमधील इन आॅरबिट मॉलमध्ये आणि २६-२७ जानेवारी रोजी पवई येथे सायंकाळी ४ ते पहाटे ४ या वेळेत या बाजारपेठांचे आयोजन करण्यात येणार आहे.रात्र बाजारपेठेव्यतिरिक्त त्या ठिकाणी वैविध्यपूर्ण सादरीकरणेही सादर करण्यात आली. अशीच सादरीकरणे यापुढील बाजारपेठांमध्येही सादर केली जाणार आहेत.