वरळी-परळची होणार वाहतूककोंडीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:13 AM2018-11-18T05:13:45+5:302018-11-18T05:13:54+5:30

एकीकडे लोअर परळ येथील डिलाइल रोड पूल पुनर्बांधकामांसाठी बंद तर दुसरीकडे मेट्रो रेल्वेचे काम, यामुळे वरळी आणि परळमध्ये प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.

 Worli-Parel will be rescued from traffic congestion | वरळी-परळची होणार वाहतूककोंडीतून सुटका

वरळी-परळची होणार वाहतूककोंडीतून सुटका

Next

मुंबई : एकीकडे लोअर परळ येथील डिलाइल रोड पूल पुनर्बांधकामांसाठी बंद तर दुसरीकडे मेट्रो रेल्वेचे काम, यामुळे वरळी आणि परळमध्ये प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. या वाहतुकीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी येथील चार महत्त्वांच्या मार्गांवरील तब्बल सात झाडे तोडण्यात आली आहेत. याने वरळी आणि परळमधील वाहतुकीची वाट मोकळी होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
लोअर परळ येथील डिलाइल रोड पूल धोकादायक असल्याने दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याच वेळी वरळी नाका येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाने वेग घेतला. पुनर्बांधकामासाठी पूल बंद असल्याने येथील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. याचा परिणाम वरळीवरील वाहतुकीवर होत आहे. मेट्रोच्या कामामुळे वरळीमध्ये वाहतुकीचा तासन्तास खोळंबा होत आहे. या पार्श्वभूमीवर जी दक्षिण विभागातील वाहतुकीचा आढावा महापालिकेने घेतला होता.
मेट्रोच्या कामात व्यत्यय आणणे शक्य नाही, तर डिलाइल रोड पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे येथील चार महत्त्वाच्या मार्गांमध्ये असलेल्या झाडांचाही प्रतिकूल परिणाम वाहतुकीवर होत असल्याचा अंदाज लावण्यात आला. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण समितीच्या पूर्व परवानगीने वाहतुकीला अडथळा ठरणारी सात झाडे रस्त्यावरून हटविण्यात आली.

झाडाचे पुनर्रोपण वरळी स्मशानभूमीत
अपोलो मिल कंपाउंडजवळ असणाऱ्या ६० फुटी बोरीचा मार्गावर रस्त्यावरच असणाºया तीन झाडांमुळे ६० फुटी रस्त्यापैकी केवळ २० फुटांचाच रस्ता प्रत्यक्ष वाहतुकीला उपलब्ध होत होता. झाडे हटविल्यामुळे हा ६० फुटी रस्ता प्रत्यक्षपणे वापरण्यात येण्यासह इतर मार्गांची वाहतूकदेखील खुली होणार आहे. येथील तीन झाडांपैकी एका सक्षम झाडाचे पुनर्राेपण वरळी स्मशानभूमी परिसरातच करण्यात आले आहे.

झाडांचे पुनर्राेपण
तोडण्यात आलेल्या सात झाडांपैकी सक्षम असणाºया तीन झाडांचे क्रेनच्या साहाय्याने वरळी स्मशानभूमी परिसरात पुनर्रोपण करण्यात आले आहे, तर उर्वरित चार झाडे बाधित होती. ही सात झाडे हटविल्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली.

या मार्गांचीही कोंडी फुटणार
दीपक टॉकीजजवळ असणारी ना. म. जोशी मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी चार झाडे हटविण्यात आली आहेत. याच झाडांपैकी दोन सक्षम झाडांचे पुनर्रोपण वरळी स्मशानभूमी परिसरात करण्यात आले आहे. यामुळे ना. म. जोशी मार्गासह सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गोखले आदी मार्गांवरील वाहतूक मोकळी होण्यास मदत होणार आहे.

Web Title:  Worli-Parel will be rescued from traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई